________________
(११३)
समयांत पदार्थामध्ये स्थित्यंतर होते हैं मानले पाहिजे. याचे उदाहरण असे समजावे की, एक मूल आहे, ते काही वर्षांनी तरुण अवस्थेला धारण करते. त्याला ही तरुण अवस्था एकदम प्राप्त झाली काय ? नाही. त्याच्या बाल्यावस्थेचा नाश प्रतिसमयी होत गेला व नवीनता प्रतिसमयीं प्राप्त होत गेली. या क्रमाने त्याला तारुण्य प्राप्त झाले. कोणताही पदार्थ आपण पहा; त्याची अवस्था क्रमाने प्रत्येक समयीं बदललीच पाहिजे. तेव्हां अवस्थांकडे आपण लक्ष्य दिले मणजे पूर्वीच्या अवस्थेहून पुढची अवस्था निराळी आहे असे समजून येते व त्यामुळे पदार्थ अनित्य आहे असे वाटते; जेव्हा अवस्थांकडे लक्ष न देता आपले लक्ष केवळ पदार्थांकडेच जाते त्यावेळेस तोच हा पदार्थ आहे असे चटकन् आपल्या लक्ष्यांत येतें ह्मणून आपण पदार्थ नित्यही आहे, असें ह्मणतो. पदार्थामध्ये नित्यत्व व अनित्यत्व हे दोन धर्म आहेत; त्यामुळे आपणांस दोन त-हेचे बान होते. यावरून पदार्थ नित्यानित्यात्मक आहे हे सिद्ध झाले.
परन्तु एक पदार्थामध्ये भावाभावात्मकता व नित्यानित्यात्मकता हे धर्म रहाणे विरुद्ध वाटते हे मणणे योग्य नाही. याचे उत्तर आह्मीपूर्वीच दिले आहे; व तें हैं की, या दोन विरुद्ध धर्माचा परस्पर दृढ अविवाभाव सम्बन्ध आहे. यामुळे याच्यांत विरोधाचें नांव ही घेणे नको. यांच्यामध्ये अविरोध कसा आहे याचे थोडेसें आपण विवेचन करूं या. ___ कार्य उत्पन्न होण्यास दोन कारणांची जरूरत लागते. एक अन्तरङ्ग कारण, ज्याला आपण उपादान कारण या नावाने ओ
खतो. दुसरे बहिरंग कारण, ज्यास सहकारिकारण असें. मणबात. हे कारण उपादान कारणास कार्य करतेवेळेस मदव करते झणून यास सहायक असेंही झणतात. उपादान कारणा
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org