________________
( १०९ ) ळखता येणार नाही. तसेंच नास्तित्व हा धर्म पदार्थामध्ये असतो तो पदार्थापासून वेगळा मानला तर धर्म व धर्मी या उभयतांचा नाश होईल, जसें अभिपासून त्याची उष्णता वेगळी मानली तर अमि थंड होईल व उगता केव्हां तरी निराधार आपण पाहिली आहे काय ? त्याचप्रमाणे नास्तित्व धर्मही निराधार राहू शकत नाही, असें मानल्यास उभयतांचा अभाव झाल्यामुळे शून्यता दोष येतो. - तसेंच अस्तित्त्व नास्तित्वामध्ये सर्वथा अभेद मानला तर अस्तित्व नास्तित्व स्वरूपाचे होईल.नास्तित्वही अस्तित्वस्वरूपाचें होईल. यामुळे सर्वसंकर होईल. कारण, वस्तूमध्ये नास्तित्वधर्म असल्यामुळे प्रत्येक पदार्थ भिन्न स्वरूपाचा दिसत असे. परंतु आतां नास्तित्वाचा अस्तित्वाशी बिलकुल अभेद मानला. यामुळे प्रत्येक पदार्थामध्ये एकरूपता आल्यामुळे, द्रव्य, गुग, सामान्य, विशेष इत्यादि पदार्थांचा अभाव होऊन सर्वांना एकता येईल. व त्यांचे विशेष स्वरूप ज्ञानगोचर होईनासे होतील. __ यासाठी अस्तित्व नास्तित्व हे दोन धर्म वस्तूपासन कथंचित् भिन्न व अभिन्न मानले पाहिजेत. ह्मणजे कोणताही दोष येत नाही. धर्माता धौपासन-पदार्थापासन कथंचिदभिन्न मानतात तें असें, धर्म व धर्मा हे परस्परांपासून वेगळे करतां येत नाही. पदार्थाचा अक हिस्सा धर्माचा आहे व अमुक हिस्सा पदार्थाचा आहे हे बिलकुल दिसून येन नाही. परंतु धर्माचे लक्षण भिन्न आहे व धर्माचे लक्षण भिन्न आहे धर्म अनेक असतात, धर्मी एक असतो. तसेंच द्रव्यास-पदार्थास धर्मी असें नांव आहे व स्वभावास धर्म असें नांव आहे. धर्मा हा आधार असतो व धर्म हे आधेय असतात, तसेच धर्माचे गुणांचे लक्षण भिन्न आहे. ते धर्म-गुण द्रव्याच्या आश्र
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org