________________
(१०८)
हेतुत्व व अहेतुत्व हे दोन धर्म अपेक्षेने सिद्ध होतात, तसेंच वस्तूमध्ये देखील स्वद्रव्यचतुष्टयाच्या अपेक्षेनें अस्तित्व व परद्रव्यचतुष्टयाच्या अपेक्षेनें नास्तित्व हे दोन धर्म जरी वि. रुद्ध वाटतात तथापि अविनाभाव सम्बन्धार्ने राहतात. यांचा अविनाभाव संबंध असल्यामुळे यांच्या पैकी एकाचा जर अभाव मानला तर दुसऱ्याचा देखील अभाव होणारच. व अशाने वस्तुही आकाशपुष्पाप्रमाणे अभावात्मक होईल. यावरून वस्तूमध्ये हे दोन धर्म हमेशा असतात हे सिद्ध झालें,
आतां अस्तित्व, नास्तित्व हे दोन धर्म वस्तूमध्यें आहेत खरें, परंतु हें धर्म वस्तूपासून सर्वथा भिन्न किंवा सर्वथा अ भिन्न मानू नयेत. तसे मानल्यास सर्वथा वस्तूचा अभाव होईल, हे कसे? याचे वर्णन याप्रमाणं समजावें.
अस्तित्व धर्म पदार्थापासून सर्वथा भिन्न मानला तर प दार्थाचा बिलकुल अभाव होईल. कारण, अमुक एक पदार्थ जगांत आहे हे आपण त्याच्या अस्तित्व धर्मावरूनच ओ खतो. यासाठी अस्तित्व धर्म पदार्थापासून कथञ्चित् भिन्न मानला पाहिजे. तसेच अस्तित्व हा पदार्थाचा धर्म आहे व तो धर्म पदार्थाच्या आश्रयाने राहतो. पदार्थांहून मनमान व्यास तो निराश्रय निराधार होईल व त्वा धर्माचाही अभाव होईल. [ह्मणजे] पदार्थापासून धर्मास भिन्न मानल्यास धर्माचा व धर्माचा पदार्थांचाही अभाव होइल. व वस्तु शून्य होईल, हा दोष येतो.
त्याचप्रमाणे नास्तित्व धर्मही पदार्थापासून सर्वथा भिन्न मानल्यास त्या पदार्थामध्ये परस्पर संकर होईल. हागजे ज्या पदार्थामध्ये अस्तित्व आहे त्याचे व नास्तित्व धर्मापासून भिन्न असलेल्या पदार्थाचे स्वरूप भिन्न मित्र आपणास श्रो
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org