________________
(१०५) आपण प्रत्यक्ष प्रमाणाने पदार्थांचा विचार केला तरी तो अनेकधर्मात्मक दिसून येतो. जसे शब्द कानाला ऐकू येतो, त्याचे श्रावण प्रत्यक्ष होते, त्याचप्रमाणे त्याच्यांत डोळ्याने न दिसणे, जिभेने चाखतां न येणे हे जे धर्म आहेत त्याचेही प्रत्यक्ष होते. नाकाला शब्दाचा वास येत नाही तो देखील धर्म त्याचा प्रत्यक्षाने दिसून येतो. जसे आपणास खोलीत घागर आहे, ती आण, असे एकाने सांगितले. व आपण खोलीत जाउ.न पाहतो तो तेथे आपणास घागर दिसली नाही, तेथील जमीन दिसली तेव्हां येथे डोळ्याने आपण जमीन पाहिली व घागरीचा अभावही पाहिला. घागरीचा अभाव पाहण्यास डोळ्याशिवाय इतर इंद्रियाची जरूर लागत काय? नाहींना? तद्वत्च वस्तूचा भाव व अभाव हे दोन्ही धर्म देखील आपल्या. स प्रत्यक्ष दिसतात. स्वद्रव्यचतुष्टयाच्या अपेक्षेनें वस्तु मदास्मक आहे व परद्रव्य चतुष्पाने ती अभावात्मक आहे. ध. टामध्ये पटात्मकता नाही मगून अभाव धन तेथे दिसून येतो; व घटामध्धे घटात्मकता आहे मगून भाव धर्मही तेथे आहे. यावरून एका प्रत्यक्षप्रमाणाने देखील भावाभावात्मकता दि. सून येते हैं दाखविण्यासाठी आचार्यांनी प्रमाणसिद्धं' हे पद योजिलें आहे. तेव्हां श्री पुष्पदन्त जिनांनी जो तत्वोपदेश केला तो प्रमाण मानला पाहिजे हे सिद्ध होते. श्री पुष्पदन्त तीर्थकरांना सुविधि असें ही दुसरे नांव आहे. व हे त्यांचे नांव सार्थक आहे. कारण, सु झणजे उत्तम निर्दोष, विधि मणजे क्रिया-चारित्र. उत्तम चारित्राला यांनी पाळले होते. ह्मणून यांचे नांव सुविधि असे आहे. चारित्र मोहनीय कर्माचा पूर्ण क्षय झाल्याने चारित्र निर्दोष व पूर्ण होते. व त्याचा उपशम झाल्याने देखील पूर्णता चारित्रामध्ये येते. परन्तु ती अन्तर्मु
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org