________________
चित् मोहरहितही आहेत. यास्तव त्यांचे पचन अप्रमाण नाही. परंतु कपिल बौद्धादिकांनी में तत्वांचे स्वरूप सांगितले ते अप्रमाण आहे. परस्पर विरुद्धता त्यामध्ये आढळून येते. व सर्वज्ञपरंपरेचा त्यांनी आश्रय केला नाही. तसेच त्यांनी सर्वथा ए. कांतवाद मानला आहे. वस्तूमध्ये एकच धर्म आहे असे मानणे यास एकांतवाद ह्मणतात. ह्मणजे वस्तु नित्यच आहे किंवा ती अनित्यच आहे, ती एकच आहे किंवा अनेकच आहे, वस्तु सर्वथा सदात्मकच आहे अथवा ती अभावात्मकच आहे, असे मानणे या सर्वांस एकांतवाद ह्मणतात. परंतु श्री पुष्पदंत तीर्थकरां. मी या सर्व एकांत वादांचे खण्डन करून अनेकांत वादाचे समर्थन केले.
वस्तू मध्ये नित्यानित्यात्मकता, एकानेकात्मकता,व भावाभावास्मकता ही अपेक्षेने सिद्ध करता येतात. यामुळे परस्पर विरुद्ध दिसणारे धर्म मोठ्या एकोप्याने वस्तूमध्ये राहतात ह्मणून विसंगतपणा दिसून येत नाही. द्रव्यार्थिक नयाच्या अपेक्षेनें वस्तु नित्य आहे व पर्यायाच्या अपेक्षेने ती अनित्य आहे. कारण पर्यायाचा नाश होतो ते अनित्य आहेत. व द्रव्य सर्व पर्यायामध्ये दिसून येतें पर्यायाबरोबर त्यांचा नाश होत नाही. जर तें पर्यायाबरोबरच नाश पावतें तर उत्तर पर्यायामध्ये द्रव्य आपपांस दिसून येते ना. तसेच आपणांस प्रत्यभिज्ञानही झाले नसते. ते ज्ञान पूर्वोत्तर पर्यायांला धारण करणा-या द्रव्यामध्ये होत असते. यावरून द्रव्यत्वदृष्टीने पदार्थ नित्य आहे व पर्यायदृष्टीने पदार्थ अनित्य आहे. तसेंच द्रव्य दृष्टीने पदार्थ अखण्ड पिंड असा एकच दिसतो व पर्याय दृष्टीने त्यामध्ये अ.. नेकपणा आढळून येतो. यास्तव आचार्यांनी तत्वचिं वर्णन करितांना श्लोकांत ' तदतत्स्वभावम् ' असा २.ब्द ठेविला आहे.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org