________________
( ९७ ) भिन्नं, अङ्ग देहः तस्य लक्ष्मीः परमकान्तिः तस्याः परिवषो मण्डलं सेन भिन्न विदारितं । ननाश नष्टं । किं तत् ! तमः । कैरिवेत्याह तमोरेरित्यादि । तमसोऽन्धकारस्यारिस्तमोरिरादित्यस्तस्य रश्मयः किरणास्तैरिव भिन्नं ध्वस्त । न केवलं बाह्यमेव ननाश, बहु मानसं च । मनसि चिदास्मन्यात्मस्वरूपे भवं मानसं तमोऽज्ञानं । कथम्भूतं ? बहु प्रचुर अनेकप्रकार ज्ञानावरणोदयनिबन्धनम् | चकारः समुचये । कथम्भूतं सत्तन्ननाशेत्याह-ध्यानेत्यादि । ध्यानमेव प्रदीपोऽज्ञानतमोपहन्तत्वात् तस्यातिशयः परमप्रकर्षः तेन भिन्नं विदारितम् ॥ ..
मराठी अर्थः -ज्याप्रमाणे अंधकाराचा शत्रु जो सूर्य त्याच्या किरणांनी दाट अशा अंधकाराचा नाश होतो. तद्वत् श्रीचंद्रप्रभतीर्थकरांच्या दिव्यशरीरकांतीने बाहेरील सर्व अंधकार नाहींसा केला. व शुक्लध्यानरूपी दिव्याच्या उत्कृष्ट प्रकाशाने अंतःकरणांत-चित्स्वरूपी अशा आत्म्यामध्ये ज्ञानाचरण कर्माच्या उदयाने उत्पन्न झालेला पुष्कळ अज्ञानरूपी अं. धकार नाहीसा केला. __भावार्थ:- दृष्टिप्रतिबंधक असा अंधकार जसा सूर्य नाहीसा करतो त्याचप्रमाणे पुष्कळ उज्ज्वल रत्ने, नक्षत्रे हीही करतात. परन्तु जीवांच्या आत्म्यांतील अज्ञानरूपी अन्धकाराचा नाश करवत नाही, अज्ञानांधकाराचा नाश करण्यास केवल जिनेन्द्र भगवान् समर्थ आहेत. जसा दिवा स्वतः उज्ज्वल असतो तो बाह्य अन्धकार नाहीसा करून पदार्थांचे ज्ञान करून देतो. तद्वत् श्री जिनेन्द्र चंद्रप्रभ तीर्थकर हे स्वतः केवलज्ञान रूपी प्रकाशाने संपन्न होते. त्यांनी भव्यांना धर्मोपदेश देऊन त्यांचे देखील अशान दूर केले. भगवानांनी शरीरकान्तीने अंधकाराचा नाश केला. व केवलज्ञानाने आध्यात्मिक अंधाराचा नाश केला. यावरून सूर्यापेक्षा यांच्यामध्ये ही विशेषता होती,
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org