________________
( ९८ )
इत्थग्भूतस्य च भगवतो बचः श्रुत्वात्मपक्षा कारच्युताः परवादिनः संपन्ना इति दर्शयन्नाह ।
अज्ञानास दूर करणारी भगवंताची वाणी ऐकून स्वतःचा पक्ष उत्तम आहे असें समजणाऱ्या वादि जनांचा गर्व नाहीसा झाला हे आचार्य दाखवितात.
स्वपक्षसौस्थित्यमदावलिप्ता, वाक्सिहनादैर्विमदा बभूवुः । प्रवादिनो यस्य मदार्द्रगण्डा,
गजा यथा केशरिणो निनादैः ॥ ३८ ॥
स्वपक्षेत्यादि । स्वस्य पक्ष मतं तस्य सौस्थित्त्यं सुस्थितित्वं तस्मि - न्मदोऽस्मदीयमेव मतं शोभनं बाधविधुरं यथा भवत्येवं स्थितं नान्यदिति दर्पः तेन अवलिप्ताः समन्विताः । के ते ? प्रवादिनः प्रगतं प्रमाणानुपपन्नं वदन्तीत्येवंशीलाः प्रवादिनोऽन्यतीर्थाः । बभूवुः संजाताः । कथम्भूताः ! विमदा विगतदर्पाः । कैः ? वाक्सिहनादैः वाच एव सिंहनादाः परपराजयहेतुत्वात् अजय्यत्वाच्च । कस्य ? यस्य चन्द्रप्रमस्वामिनः । दृष्टान्तमाह- मदाद्रेत्यादि । यथा केशरिणः सिंहस्य निनादैः शब्दगंजा हस्तिनो म दद्रिगण्डा मदार्द्रकपोला विमदा बभूदुः तथा भगवद्वचोभिः परवादिन इति ।
मराठी अर्थः- गळत असलेल्या मदाच्या योगें ज्यांचे गंडस्थळ भिजून चिंब झाले आहे असें मत्त हत्ती सिंहाच्या गर्जनेनें जसें मदरहित होतात. त्यांची सगळी मस्ती पार नाहींशी होतें. त्याचप्रमाणे आपलेच मत उत्कृष्ट आहे, त्यामध्यें कोणतेही दोष नाहींत. त्याची रचना उत्तम झाली आहे असा अभिमान बाळगणारे व प्रमाणविरुद्ध वस्तूचें स्वरूप प्रतिपादन करणारें असें इतर बदी चन्द्रप्रभतीर्थंकराच्या दिव्यध्वनि
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org