________________
( ९५) हमेशाच मुक्त आहे, असे त्यांचे मणगे आहे, परंतु हे त्यांचे मणणे अयोग्य आहे. कारण, आत्मा जर सर्वथा अबद्ध मानला तर बंध मोक्षाची जी प्रक्रिया आहे ती सर्व व्यर्थ होईल. बंधाची कारणे आपण दूर सारतो. मोक्षाच्या प्राप्तीची कारणे जवळ करतो. हे सर्व वेडेपणाचे होईल. बंध व मोक्ष याचा व्यवहार . आत्न्यामध्येच होतो. कोणीही कर्म बद्ध झाले व तेच मुक्त झाले असें ह्मणत नाही. तसेच कर्म तर अचेतन आहे. त्यामध्ये बंध व मोक्ष यांची प्रवृत्ति कशी होईल ? यावरून चतन पदार्थच अशुद्ध अवस्थेत जोपर्यंत आहे तोपर्यंत बंध आहे, जेव्हां त्यास शुद्ध अवस्था प्राप्त होते तेव्हां तो मुक्त होतो. जरी कमामध्ये बंध व मोक्ष यांचा व्यवहार झाला तथापि तो आल्याच्या बध व मोक्षावर अवलबून आहे. आत्मा बद्ध झाला झणजे कर्म बद्ध झाले असे आपण ह्मणतो. तो मुक्त झाला झणजे कर्म मुक्त झाले असे आपण ह्मणतो. यावरून कर्मावि. पयों बधमोक्षाचा व्यवहार मुख्य नाही असे सिद्ध होते. या. स्तव प्रकृति बद्ध होते व ती मुक्त होते हैं ह्मणणे योग्य नाही. मन व आत्मा हे दोन पदार्थ नाहीत. सांख्यांनी मन प्राकृतिक्रमानले आहे. आत्म्यास त्यापासून भिन्न मानतात. मनच बद्ध होते व तेच मुक्त होते असे मानले तर आत्मतत्व मा. नण्याची जरूरतच राहिली नाही याविषयी विद्यान्दस्वामींनी आपल्या स्तोत्रामध्ये असे झटले आहे.
मनो विपरिणामकं यदिह संसतिं चाश्नुते । तदेवच विमुच्यते पुरुषकल्पना स्याद् वृथा । नचास्य मनसो विकार उपपद्यते सर्वथा । . ध्रुवं तदिति हीष्यते द्वितयवादिता कोपिनी ॥१॥
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org