________________
मराठी अर्थ:-चन्द्राच्या किरणाप्रमाणे गौरवणीला धारण करणारे व पृथ्वीतलावर जणू काय दुसरा मनोहर चन्द्रच अवतरला आहे, असें (आकाशस्थ चन्द्र आपल्या किरणांनी सर्व दिशा प्रसन्न करीत असतो व सुंदर असतो.) चन्द्रप्रभ तीर्थकर देखील सर्व पदार्थाना प्रकाशक अशा केवलज्ञानरूपी किरणांनी अतिशय मनोहर दिसतात. शतेंद्राकडून वंदनीय, गणधर देवादि मुनींचें स्वामी व ज्यांनी आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या क्रोधादि दुर्जय कषायांला जिंकले आहे, सर्व कर्माचा ज्यांनी पराजय केला आहे, अशा चन्द्रप्रभ तीर्थकरांस मी नमस्कार करतो.
भावार्थः-या तीर्थकरांचें चन्द्रप्रभ हे नाव सार्थक होते. कारण, त्यांच्या शरीराचा वर्ण शरत्कालांतील चंद्राच्या सुंदर किरणाप्रमाणे नयनमनोहर होता. तसेच या श्लोकांत 'जितस्वान्तकषायबन्ध ' हे पद आचार्यांनी योजिले आहे. याचा अर्थ वर दर्शविलेला आहे. क्रोधादिक कषाय मनामध्ये उत्पन्न होतात त्य योगें कर्मबन्ध होतो. मन व आत्मा यामध्ये काही फरक नाही. जेवढ्या आत्मप्रदेशामध्यें नोइंद्रियावरण कर्माचा क्षयोपशम झाला आहे त्या आत्मप्रदेशांना मन, अंतः-. करण ही संज्ञा आहे. यावरून कषायांनी मन बद्ध होते याचा अर्थ कषायांनी आत्मा बद्ध होतो असा केल्यास काही हरकत नाही.
परंतु सांख्य मन व आत्मा हे भिन्न आहेत असे मानतात व मन प्रकृतीपासून उत्पन्न होते. क्रोधादिक कषायापासून मनाला बंधन प्राप्त होते, ते त्यांनी बद्ध होते. आत्मा.क्रोधादि कषायांनी बद्ध होत नाही. तो निर्लेप आहे. कर्मबंधनरहित आहे, प्रकृतिच बद्ध होत असते व तीच मुक्त होत असते ते, आत्मा
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org