________________
( ९२ ) कल्याणाचा उपदेश केला. आत्म्याचे कल्याण मोक्षाची प्राप्ति झाल्याने होते. मोक्षाची प्राप्ति सम्यग्दर्शन, ज्ञान व चारित्र या तीन कारणापासून होते. हे आपण अज्ञ जीवांस समजाऊन सांगितले. माता जशी आपल्या मुलाला हितकर उपदेश करते, तसाच हिताचा उपदेश आपण भव्य जीवांना केला. मोक्षप्राप्ति करून देणाऱ्या सम्यग्दर्शनादि गुणांचे अन्वेषण करणाऱ्या भव्य जीवांना आपण सन्मार्गात प्रवृत्त केले त्यांना सन्मार्ग दाखऊन दिला. यास्तव हे गुणसागरा ! गणधग़दिकच. आपली स्तुति करतात असे नाही. ज्याला सन्मार्गाची प्राप्ति झालेली आहे असा मी देखील [ समन्तभद्र ] मनाने, वाणीने व शरीराने आपली स्तुति अतिशय भक्तीमध्ये लीन होऊन करतो.
तात्पर्य-गणधरदेवांनी आपली स्तुति केली हे योग्यच आहे. कारण, त्यांना चार ज्ञाने असतात, यामुळे त्यांनी आपल्या पुष्कळ गुणांचे वर्णन केले असेल-स्तुति केली असेल. परंतु मी तर [ समन्तभद्रस्वामी ] अज्ञानी आहे. यास्तव मी आपली स्तुति भक्तिवश होऊन दोन चार वेड्यावाकड्या शब्दांनी केली आहे. आपल्या अनंत गुणांचे वर्णन करण्यास मी समर्थ नाही. या श्लोकांत ग्रंथकाराने आपली लघुता प्र. कट केली आहे.
याप्रमाणे सुपाश्चै जिनाचें हैं सातवें स्तोत्र संपले
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org