________________
(८६) सामर्थ्ययुक्त आहे असे अणावें तर ते योग्य दिसत नाही. प्रत्यक्षाने इंद्रियगोचर पदार्थांचे ज्ञान होते. परंतु देव हैं अतीन्द्रिय असल्यामुळे त्याचे प्रत्यक्षाने ज्ञान होत नाही. आता अनुमानाने देवाचे स्वरूप समजून येते काय याचा विचार
करं.
____ अनुमान झणजे अविनाभाव संबंध आहे. अशा पदार्थापैकी एका पदार्थांचे प्रत्यक्षज्ञान झाल्याने दुसरा पदार्थ अप्रत्यक्ष असला तरी त्याचे काल्पनिक स्वरूप आपल्या लक्षांत येते. व कदाचित् एखाद्या मनुष्यास तद्विषयक संशय उत्पन्न झाल्यास तो अप्रत्यक्ष पदार्थ जेथे आहे तेथे जाऊन त्याला स्या पदार्थाचे ज्ञान करून घेता येते. तेव्हा अशा त-हेचे जें ज्ञान त्यास अनुमान ज्ञान ह्मणतात. जसें पर्वतावर आपण धूर पाहिला अणजे तेथें अग्नि आहे असें में ज्ञान होते ते अ. नुमान आहे. अथवा नदीला पूर आलेला आहे हे आपण पाहिल्यावर नदीच्या वरच्या प्रदेशावर पाऊस पडला आहे असें चटकन लक्षात येते. जरी वरच्या प्रदेशावर पाऊस पडलेला आपण पाहिला नाहीं तथापि पावसाचा व नदीच्या पूराचा अविनाभाव संबंध आहे हे लक्ष्यांत येते व पूर पाहिला झणजे पाऊस पडल्याची कल्पना होते. यासच अनुमान शान मणतात. येथे दैव आहे याचा निश्चय आपणास अनुमानार्ने करून घेतला पाहिजे. तसेच आपल्याला जे चांगले पदार्थ एखाद्यावेळेस मिळतात व एखाद्या वेळेस त्या पदार्थांचा वियोग होतो ह्या गोष्टी नित्य आपणास प्रत्यक्ष अनुभवास येतात. या गोष्टीवरूनच दैवाचा निश्चय होतो. शुभाशुभ दैवाने आपणास इष्ट पदार्थ मिळतात किंवा अनिष्ट पदार्थाचा संयोग व वियोग होतो हे दैवाचे कार्य आहे. हे कार्य पाहून दै.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org