________________
( ८७ )
चाची कल्पना आपल्या मनांत येते कार्य पाहून कारणाची कल्पना करणें हा अनुमानाचा विषय आहे. येथें शुभाशुभ कर्म है अभ्यंतर कारण आहे व द्रव्य, क्षेत्र, काल व भाव ही बाह्य कारणें आहेत. या दोन कारणापासून हानि किंवा लाभ हीं कार्ये उत्पन्न होतात. या कार्यापासून देवाचे भवितव्यतेचें ज्ञान होते. ह्मणून भवितव्यता शक्तिशाली आहे हैं सिद्ध झालें.
परंतु मंत्र तंत्र इत्यादि प्रत्यक्ष सामग्री जुळऊनच मनुष्य स्वतःला सुखाची प्राप्ति करून घेतो किंवा या सामग्रीपासून तो दुसन्याला दुःख उत्पन्न करतो; असे आपण प्रत्यक्ष पाहतो. असें असतां देवापासूनच सुखदुःखाची प्राप्ति होते असें ह्मणणे योग्य नाहीं; अशीही शंका मनांत येते. यावरून देवालाच कां प्रबल मानावें ? आह्मी तर प्रयत्नालाच प्रबल मानणार ? असें ह्मणर्णेही योग्य दिसत नाहीं. कारण, संसारी जीव सगळे असमर्थ आहेत. ते सदा अहंकार व अज्ञानानें पीडित झाले आहेत. ह्मणून भवितव्यतेच्या अभावी केबळ मंत्रतंत्रादिकांच्या साहयानें त्यांना सुखदुःखाची प्राप्ति होत नाहीं.
जर भवितव्यतेच्या अभावी देखील मन्त्रतन्त्रादिक प्रत्यक्ष दिसणाऱ्या सामग्रीनेच सुख दुःखादिक उत्पन्न करण्यास आत्मा समर्थ होतो असें ह्मणाल तर जितक्या प्राण्यांनी ही सामग्री जुळविली असेल त्यांना समानच फल मिळालें असतें. सुखदुःखादिक फलामध्यें जी तरतमता दिसून येते ती दिसून आली नसती. परन्तु फरक दिसून येतो.
ज्यांना समान उपदेश मिळाला आहे, मन्त्रतन्त्रादिक क्रिया देखील विलकुल समान ज्यांच्या आहेत, आहार व रा
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org