________________
( ८२ )
शानादिक गुणांच्या पूर्णतेलाच स्वास्थ्य क्षणतात. या स्वास्थ्याची प्राप्ति आत्मा सर्व कर्मापासून विमुक्त झाला - सुटला ह्मणजे होतें. अशा स्वास्थ्याची प्राप्ति करून घेणें हें आत्म्याचे ध्येय आहे. हाच त्याचा स्वार्थ आहे. बानादिक हे आत्म्याचें गुण असल्यामुळे अविनाशी आहेत. व अविनाशी पदार्थांची प्राप्ति करून घेणे हाच स्वार्थ आहे. वैषयिक सुखादिकांचा जो अनुभव येतो तो स्वार्थ नव्हे. कारण, तो अनुभव चिरकाल टिकणारा नाहीं. बुद्धिमान मनुष्याचे सर्व प्रयत्न नित्य टिकून राहणा-या आत्मस्वरूपाच्या प्राप्त्यर्थच होत असतात. परंतु विषयानुभव तसा नाहीं तो वीज चमकून जशी नाहींशी होते तद्वत् नाहींसा होतो. हा विषयानुभव चंचल असूनही यापासून शांति मिळते हाणून याला स्वार्थ ह्मणर्णे अयोग्य आहे. कारण यापासून उत्तरोत्तर अभिलाषा वाढत गेल्यामुळे शारीरिक व मानसिक दुःखे शांत होत नाहींत.
?
याप्रमाणें सुपार्श्व तीर्थकरांनी भव्यांना उपदेश केला सुपार्श्व झणजे 'सुंदर आहेत शरीराच्या दोन बाजू ज्याच्या असा ' एवढाच अर्थ घ्यावयाचे नाहीं. सुपार्श्व शब्द उपलक्षण समजून व्यांच्या शरीराचे सर्व अवयव सुंदर आहेत' असा अर्थ घे तला पाहिजे. कारण, तीर्थकराच्या शरीराचे विशिष्ट भागच सुंदर असतात असे नाहीं. तीर्थकर सर्वांगसुंदर असतात यास्तव सातव्या तीर्थकरांना सुपार्श्व हें नांव सार्थक होतें.
न केवलं तत्सुखादीनां स्वरूपं कथितवानपितु शरीरस्य चेत्याह ।
4
भगवंतानी केवल इंद्रियजन्य सुखाचेंच स्वरूप दाखऊन दिलें असें नाहीं, त्यांनी शरीराचे स्वभाव देखील वर्णिले आहेत हे दाखवितात.
अजंगमं जंगमनेययंत्रं,
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org