________________
सर्वज्ञलक्ष्म्या ज्वलिता उज्ज्वला दीप्ता । तज्ज्ञानवत्सर्वत्राप्रतिहता इत्यर्थः । तथाभूतां सरस्वती बभार । विमुक्तः सकलसंगविवर्जितः । परमयतिरित्यर्थः ।
मराठी अर्थ:-हे भगवन् ! मोक्षप्राप्ति होण्याच्या पूर्वी आहत्य अवस्थेत असतांना आपण अनंतज्ञानादि चतुष्टयरूपी ऐश्वर्य, व दिव्य ध्वनि ही धारण केली. व यामुळेच आपण केलेला हितोपदेश अप्रमाण मानतां येत नाही, तो प्रमाणच आहे. तो भव्यांचे कल्याण करणाराच आहे. याचप्रमाणे आहत्य अवस्थेत आपण वेदनीय कर्माच्या सद्भावामुळे क्षुधादिक परोषहांना धारण केले नाही. कारण मोहनीय कर्माचा संपूर्णपणे आपण नाश केल्यामुळे वेदनीय कर्म निःशक्त झाले व तें आपला प्रभाव आपणांस दाखविण्यास असमर्थ झाले, यामुळे त्याच्या सद्भावाने जे अकरा परीपह उत्पन्न होतात त्यापासून आपण सर्वथा दूर आहात. अनंत ज्ञानादिक लक्ष्मीला व दिव्य ध्वनीलाच आपण धारण केले आहे. आपला दिव्यध्वनि संपूर्ण पदार्थांचे हातांतील आवळ्याप्रमाणे स्पष्ट वर्णन करणारा आहे व समवसरणादि बाह्य ऐश्वर्याने युक्त आहे. ज्यावेळेस आपण सर्व कर्माचा निःशेष नाश करून मोक्षाची प्राप्ति करून घेतली-सिद्धावस्था प्राप्त करून घेतली; त्यावेळेस निर्मल अशी अनंत ज्ञानादि विभूति आपण धारण केली. भवदीयदेहदीप्तिपतानश्च प्रतिमुक्तिलक्ष्म्याः पुरस्तात् किं कृतवानित्याह । भगवन्ताच्या शरीरकान्तीने आर्हन्त्य अवस्थेत कोणते कृत्य केलें .
हे स्तुतिकार सांगतात. शरीरराश्मिप्रसरः प्रभोस्ते,
बालार्करश्मिच्छविरालिलेप ।
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org