________________
(७१)
र वस्तु पाहणाया सुमति तीर्थकरांनी तत्वांचे स्वरूप प्रतिषादिले आहे.
हे जिनेश, तें तुमचें तत्वांचे प्रतिपादन स्तुति करणाय माझ्या बुद्धीची वृद्धि करणारे होवो. एवढीच आपल्या चरणाजवळ प्रार्थना आहे.
भावार्थ:- वस्तु सर्वथा नित्यही नाहीं किंवा ती अनित्यही नाहीं. परन्तु नित्यानित्य आहे. यामुळे आपली ज्या ध माकडे दृष्टि वळेल त्याधर्माला आपण मुख्यता देतो. व इतरास गौण समजतो. जसें समुद्रामध्ये हमेशा पुष्कळ लाटा उद्भवतात व त्यांचा नाशही होतो, तथापि समुद्राचा नाश झाला आहे काय ? समुद्राची कितीही स्थित्यन्तरें होत गेली तरी तो कायमच राहतो. त्याचा नाश होत नाहीं. जीवास अनादि कालापासून नरनारकादि पर्याय धारण करून या संसारांत फिरावे लागत आहे व अनन्तानन्त नरनारकादि पर्यायांचा नाश झाला व त्यांची तितके वेळा उत्पत्ति झाली व होईलही, परन्तु जीवाचा केव्हांच नाश झाला आहे काय ? तो सर्व पर्यायामध्ये एकच हमेशा दिसून येत आहे. इत्यादि विचार करीत असतां आपली दृष्टि पदार्थाच्या नित्यत्वाकडे असते. व ज्या वेळेस आपली दृष्टी पर्यायस्वरूपाला विषय करते त्या वेळेस वस्तु पर्यायात्मकच दिसते. तिच्यांतील नित्यता त्यावेळेस अन्तभूत होते. ती त्यावेळेस दिसत नाहीं. जसें जीवतत्वाचा आपण विचार करतो त्यावेळेस त्याचे सर्व पर्यायच नजरेस येतात. या पर्यायांना सोडून जीवतत्व वेगळे बिलकुल दिसत नाहीं. समुद्राकडे पहा, त्यांतही लाटाशिवाय आपणांस काय दिसेल ? हमेशा लाटा उत्पन्न होतात व त्या नाश पावतात. हा त्यांचा क्रम अव्याहत चालत असलेला दिसून
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org