________________
(७०)
सुमतेः शोभनमतेः तव भगवतः तां तत्त्वप्रणीति तद्वारेण भवन्तं वा स्तुवतो नमस्कुर्वतो वा मे मतेः प्रवेको प्रविशिष्टता प्रकर्षता अस्तु भवतु नाथ सुमतिस्वामिन् ।
मराठी अर्थः--श्री सुमति जिनेश्वरांनी जीवादितत्वांचे वर्णन करतांना विधि व निवेध यांचे वर्णन केलें काहे. विधि मणजे पदार्थांचे अस्तित्व-नित्यता. निषेध मणजे नास्तित्व, अनित्यता, प्रत्येक द्रव्यामध्ये नित्यत्व व अनित्यत्व ही असतातच. यांनांच आपण द्रव्यरूपता पर्यायरूपता अशी नांवे देतो. ही द्रव्यरूपता-नित्यता व पर्यायरूपता--अनित्यता श्री सुमति तीर्थकरांना सर्वथा मान्य नाही ह्मणजे सुमति तीर्थकरांनी सर्वथा वस्तु नित्यच आहे किंवा सर्वथा ती अनित्यच आहे असे मानले नाही. त्यांनी या नित्यत्व, अनित्यत्व धर्मामध्ये मुख्य-प्रधान, गौण-अप्रधान कोणास मानावे हे वक्त्याचे इच्छेवर अवलंबून आहे असे सांगितले आहे.
झणजे ज्या वेळेस वस्तूच्या नित्य स्वरूपाचे वर्णन क रण्याची वक्त्याची इच्छा असते, त्यावेळेस ती वस्तु त्यास नित्य स्वरूपाने युक्त आहे असे वाटते; व तो तिच्या नित्य स्वरूपाचेच वर्णन करतो. त्यावेळेस वस्तूंत असलेली अनि त्यता गौण ठरते. तिला वक्ता त्यावेळेस महत्व देत नाही. तसेच ज्यावेळी वक्त्याच्या अंतःकरणामध्ये वस्तूच्या अनित्य त्वाचा विचार चालला असेल त्यावेळेस तो अनित्यधर्ममुखाने वस्तूंचे वर्णन करतो.वास्तविक त्यावेळेस त्याला अनित्यता ही इष्ट वाटते व नित्यधर्म हा गौण वाटतो. अर्थात् वस्तूच्या ज्या धर्माला आपण मुख्यता द्यावी तो धर्म मुख्य समजला जातो व इतर सारे धर्म, अप्रधान-गौण, महत्वहीन समजले जातात. याप्रमाणे आपल्या केवलज्ञानाच्या सामर्थ्याने, चराच
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org