________________
( ६८ )
अवयवालाच जर तो पदार्थ आहे असे आपण मानूं लागलों तर तें आपले ज्ञान जसें मिथ्या आहे तद्वत् पयोय दृष्टीनेच किंवा द्रव्य दृष्टीनेच पदार्थाकडे पाहिलें तर त्यापासून उत्पन्न होणारें ज्ञान खरें कसें असूं शकेल.
योग, सांख्य, मीमांसक यांनी सर्वथा पदार्थ नित्य मानला आहे. व सर्वथा पदार्थ नित्य मानल्यास उत्पत्ति व वि नाश या दोन अवस्था त्यांत होणार नाहींत. उत्पत्ति झणजे द्रव्य आपल्या चेतन किंवा अचेतन जातीला न सोडता बाह्याभ्यन्तर कारणें मिळालीं ह्मणजे आपली पूर्वीची अवस्था सो डून नवीन अवस्था धारण करते. त्या अवस्थेला उत्पाद क्षणतात. व विनाश ह्मणजे पूर्वीची अवस्था नष्ट होणे यास विनाश ह्मणतात. या दोन अवस्था नित्य पदार्थात होत नाहींत.
नित्य पदार्थांत जर कहीं हलन चलनादिक क्रिया किंवा कांहीं स्थित्यन्तर झाले तर उत्पचि व विनाश हें त्यांत दिसून आले असते. नित्य पदार्थ सर्वदा एकरूप असल्यामुळे त्याच्यांत एखादी क्रिया होऊं लागली तर तीच हमेशा होऊं लागेल हा
जे हमेशा ती एकच क्रिया करूं लागेल. व तो सदा कारकच राहील. त्यामध्ये अकारकत्व केव्हाही होणार नाही. व यामुळे त्या क्रियेची केव्हांच समाप्ति होणार नाहीं. व जर तो कोणती ही क्रिया करीत नाहीं असें ह्मणाल तर तो कायमचाच क्रियारहित होईल. व त्यामध्ये सदा अकारकत्व येईल. स्वप्नामध्ये देखील त्यांत क्रिया होत असलेली दिसून येणार नाहीं.
याचप्रमाणे सर्वथा अनित्य पदार्थ मानला तरी त्यामध्ये उत्पाद व्ययही संभवत नाहींत. कारण अनित्य पदार्थ प्रथम क्षणीं उत्पन्न होऊन दुसऱ्या क्षणीं लागलीच बिलकुल नाश पावल्यामुळे तदनन्तरक्षणीं जर एखाद्या पदार्थाची उत्पत्ति झा
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org