________________
(६७ ) होतात. जो पदार्थ नाही त्याची उत्पत्ति होत नाही. अन्यथा गाढवाच्या शिंगाची देखील उत्पत्ति झाली असती. याचप्रमाणे जो पदार्थ आहे त्याचा सर्वथा नाश केव्हांच होत नाही. कारण त्या पदार्थाचे अस्तित्व नाहीसे होत नाही. तो पदार्थ आकाशांतील फुलाप्रमाणे अभावात्मक होत नाही. यावरून विद्यमान पदार्थाचाच कथंचित् विनाश व उत्पत्ति हे होत असतात. यास उदाहरण. . हे पहा की, दिवा मालवला ह्मणजे तो अंधकाररूपाने परिणत होत असतो. ह्मणजे एका पुद्गलद्रव्याच्या या दोन अवस्था आहेत. एक प्रकाशरूप. अवस्था व दुसरी अंधकाररूप अवस्था. येथे प्रकाशरूप अवस्थेचा नाश होऊन अंधकाररूप अवस्थेची उत्पत्ति झाली व या दोन्ही अवस्थामध्ये पुद्गल द्रव्य आपणास दिसून येते. लणून असत् पदार्थाची उत्पत्ति व सत्पदार्थाचा विनाशं होत नाही. ह्मणजे सत्पदार्थाच्या किती जरी अवस्था बदलल्या तरी त्याचा विनाश होत नाही. तसे जर होऊ लागले तर वासतो जन्म सतो न नाशः' हा सिद्धांत बाधित होईल. व सारी तत्व व्यवस्था बिघडून जाईल. यासाठी सर्वथा पदार्थ नित्य नाहीत. असत् पदार्थांची उत्पत्ति होत नाही. व सत्चा सर्वथा नाश नाही असे मानणे उचित आहे. .
विशेषार्थः-कोणताही पदार्थ सर्वथा नित्य नाही. द्रव्य दृष्टीने पाहिले असतां तो नित्य आहे व पर्याय दृष्टीने पाहिले मणजे तो अनित्य आहे. व या दोन्ही दृष्टी परस्पर सापेक्ष आहेत. या दोन्ही दृष्टींनी पाहिले झणजेंच वस्तूचे खरे ज्ञान होते. व एकाच दृष्टीने पाहिले असतां में वस्तूचें ज्ञान उत्पन्न होतें तें मिथ्या आहे. कारण एका दृष्टीने संपूर्ण वस्तूचे ज्ञान होत नाही त्यामुळे एखाद्या पदार्थाच्या एखाद्या अवयवालाच पाहून त्या
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org