________________
होतात त्यांसच स्वकाल ह्मणावयाचे. कारण, त्या अवस्था त्या द्रव्यापासून भिन्न भिन्न आहेत. यांसच स्वकाल ह्मणतात. . स्वभाव--गुण, पदार्थांतील गुणांस स्वभाव लणतात. यासच धर्म, प्रकृति, वगैरे नावे आहेत. द्रव्य गुणसमुदायरूप आहे. जर द्रव्याकडे आपण गुणाच्या दृष्टीने पाहिले तर त्यामध्ये सर्व गुणच दिसून येतील. द्रव्य ह्मणून वेगळे काही दिसणार नाही. जमे हे आपले शरीरच पहा ना ! याकडे आपण हात, पाय, तोंड, नाक, कान इत्यादि अवयव या दृष्टीने पाहिल्यास आपल्यास अवयवापासून वेगळे असें शरीर दिसेल काय. सर्व अवयव हणजेच शरीर. याचप्रमाणे गुणदृष्टी मनांत ठेऊन द्रव्याकडे पाहिले असतां गुणाशिवाय द्रव्य बिलकुल वेगळे दिसणार नाही.
अशा या स्वद्रव्यचतुष्टयाने प्रत्येक वस्तु आपल्या स्वरूपामध्ये रहात असते. झणूनचं स्वद्रव्यचतुष्ठयाच्या अपेक्षेने तो वस्तु सत् आहे. याप्रमाणे वस्तुमध्ये भावाभावात्मकता दिसून येते. सर्वथा वस्तु सदात्मकच आहे असें ह्मणणे योग्य नाही. तसे मानल्यास जसें वस्तु स्वरूपाने भावात्मक आहे तशी ती पररूपाने देखील भावात्मकच होईल. याचप्रमाणे वस्तु सर्वथा अभावात्मकही पण नाही. सर्वथा तिचा अभाव मानल्यास स्वरूपाने देखील तिचा अभाव होईल व यामुळे गाढवाचे शिंग जसें सत् नाही तद्वत् वस्तूचा बिलकुल अभावच होईल. यास्तव स्वरूपाच्या अपेक्षेने वस्तुचा सद्भाव सिद्ध होतो व पररूपाच्या अपेक्षेनें वस्तूचा अभाव सिद्ध होतो. ___ अद्वैतवादी सर्वथा सद्भावात्मक वस्तु मानतात. तसें मानल्यास वर सांगितलेलें दूषण प्राप्त होते. सर्वथा अद्वैत मानल्यास
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org