SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 105
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ (६३) विशेष र्थ--जैनमतामध्ये सर्व पदार्थ सदसदात्मक आहेत. कोणतीही वस्तु सर्वथा सदात्मक किंवा सर्वथा असदात्मक नाही. अर्थात् स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल व स्वभाव यांच्या योगे व. स्तुचे अस्तित्व सिद्ध होते व परद्रव्य तुष्टयाच्या अपेक्षेनें तिचे नास्तित्व सिद्ध होते. अता तेथे स्मद्रव्यचतुष्टय ह्मणजे काय या विषयी लिहिल्यास विषयान्तर होगार नाही. स्वद्रव्य झणजे गुण पर्याय यांनी युक्त जो पदार्थ त्याला द्रव्य ह्मणतात. आपल्या गुणपर्यायांनी प्रत्येक द्रव्य युक्त असते. दु. सन्या पदार्थाचे गुण व पर्याय कोणतेही द्रव्य धारण करीत नाही. अन्यथा, विवक्षित द्रव्याचे लक्षणच करता आले नसते. म्हणून उमास्वामी आचार्यानीं 'नित्यावस्थितान्यरूपाणि' या सूत्रांत अवस्थित शब्द ठेवला आहे तो याच अर्थाचा घोतक आहे. यावरून प्रत्येक द्रव्य आपल्या स्वभावामध्येच स्थिर राहते. स्वक्षेत्र हाणजे प्रदेश, पदार्थाचे अवयव, पदार्थ आपल्या प्रदेशामध्ये--अवययामध्येच राहतो क्षेत्र याचा अर्थ आकाश असाही होतो. परंतु तो अर्थ येथे घेणे इष्ट नाही. कारण, जे. वढ्या आकाशप्रदेशामध्ये तो पदार्थ आहे तेवढ्याच आकाशप्रदेशामध्ये इतर पदार्थही आहेत; तेव्हा त्या आकाशप्रदेशांना स्वक्षेत्र कसा मणतां येईल ? यास्तव पदार्थाचे जितके प्रदेश आहेत तेच त्याचे स्वक्षेत्र आहे. - स्वकाल या शब्दाचा अर्थ कालद्रव्य असा नाही. प्रत्येक समयीं अवस्था बदलत असते. यामुळे भिन्नभिन्न अवस्था उत्पन्न करण्यास प्रत्येक द्रव्य समर्थ आहे. ह्मणून द्रव्यासच काल झ. टले आहे. द्रव्य आपली अवस्था बदलण्यास उपादान कारण आहे व काल द्रव्य हे निमित्त कारण. द्रव्याच्या ज्या अवस्था Jain Educationa International For Personal and Private Use Only www.jainelibrary.org
SR No.003839
Book TitleSwayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Original Sutra AuthorN/A
AuthorSamantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
PublisherSakharam Nemchand Doshi
Publication Year
Total Pages314
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy