________________
(६२) स्ववागित्यादि । तव दृष्टिः सर्व जीवादितत्त्वमनेकांतात्मकमिति मतं । ततोऽन्यत्सत्त द्वैतलक्षणं शून्यतैकांतस्वभावं वा तत्त्वं । तत्प्रमाणं अभ्युपगच्छतां तद्वादिनां स्वयाचा विरुद्ध स्यान्माता मेघन्ध्ये त्यादिवत् । यदि हि अद्वैतं, कथं प्रमाणं, द्वैतप्रसंग.त् । यदि च शून्यतैकांतः, कथं प्रमाणं, तत्सद्भावतस्तदेकांतविरोधानुषंगात् । ... ____ मराठी अर्थः-जीवादि पदार्थ स्वरूप चतुष्टयाच्या अपेक्षेनें कथंचित् सत् आहेत. व पररूपचतुष्टयाने ते कथंचित् असत् आहेत. अशी प्रतीति( अनुभव ) येत असते. यास उदाहरण असे समजावें की स्वरूपचतुष्टयाच्या अपेक्षेनें फूल हे झाडावर दिसते परंतु आकाशामध्ये फुलाचा अभाव आहे. तात्पर्य-फुलें ही झाडाला येत असतात, ती आकाशाला लागत नाहीत. त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तु स्वचतुष्टयाच्या अपेक्षेने मात्र आपले अस्तित्व कायम ठेवितात. परचतुष्टयाच्या अपेक्षेने तिचा अभाव मानला जातो. स्वपरचतुष्टयाच्या अपेक्षेनें वस्तूचे आस्तित्व केव्हांच सिद्ध होत नाही. अशा वस्तूचे अस्तित्व सिद्ध करून देणारे प्रमाण जगांत कोणतेही नाही. ह्मणून अशा रीतीने वस्तुव्यवस्था मानणाऱ्याचे वचन विरुद्ध आहे. जसे माझी आई वांझ आहे असे मणणाऱ्याचे बोलणे अगदी विरुद्ध आहे. कारण, जिला मातृपणा प्राप्त झाला आहे ती वंध्या नसते व जी वंध्या आहे तिला मातृपणाची प्राप्ति केव्हांच होत नाही. त्याचप्रमाणे स्वपरचतुष्टयाच्या अपेक्षेने वस्तूचे अस्तित्व मानणे हे स्ववचनविरुद्ध आहे. कारण. स्वचतुष्टयाच्या अपेक्षेने वस्तूचे अस्तित्व सिद्ध होतें परंतु परचतुष्टयाचे अपेक्षेने देखील तें मानमें बिलकूल विरुद्ध आहे. यास्तव हे जिनेश आपल्या अनेकांत मतामध्येच वस्तुसिद्धि होते. यास्तव आपलेच मत सर्वोत्कृष्ट आहे.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org