________________
(६०) करू शकेल व त्यामुळे ज्ञान हा गुण सर्वाचाच मानावा लागेल. यामुळे जीव व ज्ञान यामध्ये सर्वथा भेद न मानतां कथंचित् भेद व कथंचित् अभेद मानला पाहिजे. ह्मणजेच जीव व ज्ञान यामध्ये गुण गुणिभाव सिद्ध होईल. यावरून, अनेकत्व उपचाराने आहे असें नैयायिकांचे झणणे अयोग्य आहे असे सिद्ध होते. - तसेंच बौद्ध हे, आत्म्याच्या ठिकाणी एकत्व उपचाराने आहे असे मानतात. कारण, प्रतिक्षणी आत्मा भित्रच असतो. जो आत्मा पूर्वक्षणांत होता तोच आत्मा उत्तरक्षणांत दिसून येत नाही. उत्तरक्षणी दिसणारा आत्मा वेगळाच आहे असें ते समजतात. जसें पायाची नखें आपण काढून टाकली असता पुनः ती वाढतात व त्या नखामध्ये तीच ही नखें जी पूर्वी काढून टाकली होती असें में बान होतें तें खोटें आहे. कारण, काढून टाकलेली नखें भिन्न आहेत व ने काढलेली नरखें भिन्न आहेत. तथापि तीच ही नखे आहेत; असें जे सदृश पदार्थांमध्ये एकत्वाचे ज्ञान होते हैं जसें मिथ्या खोटें आहे तसेंच प्रतिक्षणी आत्मतत्व भिन्न असतांही त्यामध्ये तोच हा आत्मा असें में एकत्वप्रदर्शक ज्ञान होते ते खोटें आहे. त्या आत्मतत्वामध्ये एकत्व औपचारिक आहे. __ परंतु हे त्यांचे ह्मणणे अनुचित आहे. कारण, प्रतिक्षणी आस्मतत्व वेगळेच मानले तर स्मरण, प्रत्यभिशान वगैरेची सिद्धि होऊ शकणार नाही. तसेच बंध व मोक्ष, पाप व पुण्य यांचीही सिद्धि होत नाही. यांची का सिद्धि होत नाही याचे . वर्णन आम्ही, 'बंधश्च मोक्षश्च तयोश्च हेतुः, या श्लोकांत केलें
आहे. यावरून जीवादिद्रव्यामध्ये एकत्व अनेकत्व विषयक में बान होते ते सत्य आहे असे सिद्ध होते.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org