________________
वामध्ये अनेक धर्म स्वाभाविक अनादि कालापासून आहेत. जीवामध्ये ज्ञान, दर्शन, सुख हे गुण हमेशा असतात. ते त्यापासून केव्हांच सर्वथा वेगळे असें दिसून येत नाहीत. तसे दिसून आले असते तर जीवाच्या ठिकाणी अनेकत्व उपचाराने आहे असे आम्ही मोठ्या खुषीने स्वीकारले असते. नैयायिकांनों जीवद्रव्यामध्ये अनेकव उपचाराने कां मानले ? या प्र. नाचे उत्तर असें आहे की त्यांनी भेदवाद मानका आहे. गुण गुणीपासून सर्वथा भिन्न आहेत. धर्म धर्मीपासून बिलकूल वेगळे आहेत. जीवद्रव्यापासून त्याचे ज्ञानादिक गुण सर्वथा वेगळे आहेत. यास्तव जीवापासून त्याचे गुण भिन्न असल्यामुळे गुणांच्या संबंधाने जीवाच्या ठिकाणी अनेकत्व आले. वास्तविक अनेकत्व तेथे नाही. यामुळे जीवांच्या ठिकाणी सुख दुःखादिपर्याय पाहून में भेदज्ञान उत्पन्न होते ते खोटें आहे. ते औपचारिक आहे वास्तविक नाही असें नैयायिक म्हणतात. परंतु हे त्यांचे म्हणणे खरे नाही. . जीवद्रव्यामध्ये ज्ञानगुम हा समवाय संध आलेला आहे असे ते ह्मणतात. परंतु विचार केला असतां जीवद्रव्य, ज्ञानगुण व समवाय हे तीन पदार्थ परस्परापासून भिन्न आहेत. जसें जीवापासून ज्ञान भिन्न आहे, तसेंच जीवापासून समवाय देखील भिन्न आहे, यामुळे तो सभवाय जीवामध्ये ज्ञानाचा संबंध कसा करूं शकेल. तसेंच ज्ञानाचा आत्यामध्ये संबंध करण्यासाठी दुसन्या समवायाची कल्पना करावी लागेल यामुळे अनवस्था दोष उत्पन्न होतो. तसेंच नैयायिकांनी एकच समवाय मानला आहे व तो व्यापक आहे असे ते मगतात. यामुळे ज्ञानगुणाची योजना जशी त्यानी आत्म्यामध्ये केली तशीच तो पृथ्वी, तेज, आकाश इत्यादिक द्रव्यामध्ये देखील
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org