________________
५२
तत्वार्थसार अधिकार २ रा
भव्य-अभव्य-संबंधी जीवामध्ये विशेषता कोणती आहे असा प्रश्न केला असताना
शुध्धशुध्धी पुनः शक्ती द्वे पाक्यापाक्यशक्तिवत् । साधनादी तयोर्व्यक्ती स्वभावोऽतर्क गोचरः ॥ (राजवार्तिक)
ज्याप्रमाणे उडीदामध्ये शिजणारे उडीद व न शिजणारे उडीद ( कुचर उडीद ) असे दोन प्रकार असतात. त्याप्रमाणे जीवामध्ये दोन प्रकार भव्य-अभव्य आहेत. जे भव्य असतात त्यांची शुद्धिशक्तिची व्यक्ती सादि असते. जे अभव्य असतात त्यांची अशुद्धिशक्ति अनादिअनंत कालपर्यंत अशुद्धच असते. असा निसर्गसिद्ध वस्तुस्वभाव आहे. वस्तुस्वभाव हा तर्कगोचर नसतो.
__ जीवाचे लक्षण अनन्यभूतस्तस्य स्यादुपयोगो हि लक्षणं ।
जीवोऽभिव्यज्यते तस्मादवष्टब्धोऽपि कर्मभिः ॥ ९॥
अर्थ- 'उपयोगो लक्षणं' जीवाचे लक्षण चेतनोपयोग आहे. (ज्ञानं स्व-परावभासकं) जे स्वावभाससहित परपदार्थाला जाणते ते जीवाचे अनन्यभूत असाधारण लक्षण आहे.
( स्वावभासनाशक्तस्य परावभासकत्वायोगात् )
जो स्वतःला जाणू शकत नाही. तो पराला देखील जाणू शकत नाही. जीवाला सोडून अन्यद्रव्ये स्वतःला जाणू शकत नाहीत म्हणून ते पराला देखील जाणू शकत नाहीत. स्व-पर-प्रकाशकत्व हा जीवाचा असाधारण स्वभाव आहे. त्यामुळे हा जीव कर्मानी व्याप्त असून देखील ज्ञान-दर्शन-स्वरूप उपयोग लक्षणाने ओळखला जातो.
उपयोगाचे भेद
साकारश्च निराकारो भवति द्विविधश्च सः । साकारं हि भवेज्ज्ञानं निराकारं तु दर्शनं ।। १० ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org