SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 92
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्त्वार्थसार । २ जो भाव कर्माचा क्षयोपशम झाला असताना प्रगट होतो त्यास क्षायोपशमिकभाव म्हणतात. ३ जो भाव कर्माचा क्षय झाला असताना प्रगट होतो त्यास क्षायिकभाव म्हणतात. ४ जो भाव कर्माचा उदय असताना प्रगट होतो त्यास औदयिक भाव म्हणतात. ५ जो भाव कर्माचा उदय-उपशम-क्षय क्षयोपशम इत्यादि अन्य कारणाची अपेक्षा न ठेवता सहजसिद्ध स्वभावरूप असतो त्यास पारिणामिकभाव म्हणतात. औपशमिक भावाचे भेद भेदौ सम्यक्त्वचारिद्रे द्वावौपशमिकस्य हि ॥ अर्थ-- औपशमिक भावाचे दोन भेद आहेत. १ औपशमिक सम्यक्त्व, २ औपशमिक चारित्र, जीवाच्या शुद्ध परिणामाने बांधलेले कर्म जेव्हा उदयास न येता सत्तेमध्ये दबून बसते त्यास उपशम म्हणतात. उपशम केवळ मोहनीय कर्माचाच होतो. मोहनीय कर्माचे दोन भेद आहेत. १ दर्शनमोहनीय, २ चारित्र मोहनीय. दर्शनमोहनीय कर्माचा उपशम झाला असता जीवाचा जो सम्यग्दर्शनगुण प्रगट होतो त्यास औपशमिक सम्यक्त्व म्हणतात. हा भाव गुणस्थान ४ ते ११ पर्यंत असू शकतो. २ चारित्र मोहनीय कर्माचा उपशम झाला असताना जीवाचा जो सम्यक्चारित्र स्वभाव प्रगट होतो त्यास औपशमिक चारित्र म्हणतात. हा भाव उपशम श्रेणीमध्ये गुणस्थान ७ ते ११ पर्यंत असतो. क्षायोपशमिकभावाचे भेद अज्ञानत्रितयं ज्ञान-चतुष्कं पंच लब्ध ।। ४ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy