SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 91
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ अधिकार २ रा जीवतत्व वर्णन अनन्तानन्तजीवानामेकैकस्य प्ररूपकान् । प्रणिपत्य जिनान् मूर्ना जीवतत्त्वं प्ररूप्यते ॥ १॥ अर्थ- अनन्तानन्त जीवपदार्थ व त्यांच्या प्रत्येकाच्या त्रिकालवर्ती सर्व अवस्थाना युगपत् जाणणारे व त्यांचे प्ररूपण करणारे अशा सर्वज्ञ जिनदेवांना नम्रभावाने नमस्कार करून या अधिकारात जीवतत्त्वाचे वर्णन करण्याची विषय प्रतिज्ञा सूचित केली आहे. जीवतत्व स्वरूप अन्यासाधारणा भावाः पंचौपशमिकादयः । स्वतत्त्वं यस्य तत्त्वस्य जीवः स व्यपदिश्यते ॥ २ ॥ अर्थ- ज्याचे औपशमिकादि पांच असाधारण भाव स्वतत्त्व आहेत ते जीवतत्त्व म्हटले जाते. जीवाचे असाधारण पाच भाव स्यादौपशमिको भावः क्षायोपशमिकस्तथा । क्षायिकश्चाप्यौदयिकस्तथाऽन्यः पारिणामिकः ॥ ३ ॥ अर्थ- जीवाचे असाधारण भाव पाच आहेत. १ औपशमिक, २ क्षायोपशमिक, ३ क्षायिक, ४ औदयिक, ५ पारिणामिक. जे जीवद्रव्याशिवाय इतर द्रव्यात आढळत नाहीत त्यांना असाधारण भाव म्हणतात. यद्यपि यापैकी काही भाव पुद्गल कर्मनोकर्माच्या संयोगात व काहीभाव वियोगात होतात तथापि त्या सर्व अवस्था जीवद्रव्याच्याच असल्यामुळे त्यांना जीवाचे स्व-तत्त्व म्हटले आहे. १ जो भाव कर्माचा उपशम झाला असताना प्रगट होतो त्यास औपशमिकभाव म्हणतात. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy