________________
तत्त्वार्थसार
४५
६ अंतर- सम्यग्दर्शनापासून च्युत होऊन जीवाला पुनः किती कालाने सम्यग्दर्शनाची प्राप्ति होते.
७ भाव- सम्यग्दर्शन हा औपशमिक- क्षायिक- क्षायोपशमिकभाव
आहे.
निश्चयनयाने सम्यग्दर्शन हा जीवाचा सहज स्वाभाविक परमपारिणामिक भाव आहे. त्याच्या आश्रयाने जीवाला पर्यायरूपाने सम्यग्दर्शनाची प्राप्ति होते.
८ अल्पबहुत्व- औपमिक सम्यक्त्वाचा काल अंतर्मुहूर्त असतो म्हणून सर्वात कमी औपशमिक सम्यग्दृष्टी आहे. क्षायिक क्षायोपशमिक सम्यग्दृष्टी मनुष्याच्या अपेक्षेने संख्यात आहेत. पण इतर गतीच्या अपेक्षेने असंख्यात आहेत. अनंत सिद्धाच्या अपेक्षेने अनंत आहेत.
उपसंहार
सम्यग्योगी मोक्षमार्ग प्रपित्सुयस्ता नामस्थापना द्रव्यभावः ॥ स्याद्वादस्थां प्राप्य तैस्तै रुपायैः प्राग्जानीयात् सप्ततत्त्वी क्रमेण । ५४ ।
__ अर्थ- प्रथम अधिकाराचा उपसंहार करताना आचार्य म्हणतात याप्रमाणे मोक्षमार्गावर आरूढ होण्यास उत्सुक अशा सम्यग्दृष्टी-ज्ञानीयोगी-श्रावक व मुनीनी नाम-स्थापना-द्रव्य भाव निक्षेप पूर्वक नयप्रमाणाच्याद्वारे निर्देश आदि सहा अनुयोगद्वारे व सत् संख्या आदि आठ अनुयोगद्वारे जीव अजीव आदि सात तत्त्वाचे हेय उपादेयरूपाने समीचीनज्ञान करून घ्यावे. क्रमाने स्याद्वाद सप्तभंगीद्वारे विचार करावा.
प्रथम अधिकार समाप्त.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org