SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 88
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्त्वार्थसार १ निसर्गज - उपदेशाशिवाय दर्शनमोहाचा क्षयोपशम झाला असताना जे प्राप्त होते ते निसर्गज. ४३ २ अधिगम - गुरुच्या उपदेशाने शास्त्र स्वाध्यायाने जे सम्यक्दर्शन प्राप्त होते त्यास अधिगमज सम्यग्दर्शन म्हणतात. सम्यग्दर्शनाचे तीन भेद आहेत. १ औपशमिक २ क्षायिक ३ क्षायोपशमिक. १ औपशमिक जे दर्शनमोहाच्या तीन प्रकृति व अनंतानबंधीच्या चार प्रकृती यांचा उपशम झाला असताना प्राप्त होते ते औपशमिक सम्यक्त्व होय. क्षय-उपशम २ क्षायिक - सात प्रकृतीचा क्षय झाला असताना जे सम्यग्दर्शन प्राप्त होते ते क्षायिक सम्यग्दर्शन होय. ३ क्षायोपशमिक - दर्शनमोहाच्या दोन प्रकृती मिथ्यात्व सम्यग्मिथ्यात्व व अनंतानुबंधीच्या चार प्रकृति या सर्वघाति प्रकृतीचा काहीचा सदवस्थारूप उपशम व काहीचा उदयाभावी क्षय व सम्यक्त्व प्रकृती देशघातीचा उदय असताना जे सम्यग्दर्शन प्राप्त होते ते क्षायोपशमिक सम्यग्दर्शन होय. वास्तविक सम्यग्दर्शन हा जीवाचा वीतराग स्वभाव परिणाम आहे. तो दर्शनमोह व अनंतानुबंधीच्या अभावात वीतराग शुद्ध आत्मानुभवरूप परिणाम आहे. पण सम्यग्दर्शनाचे चारित्राच्या अपेक्षेने दोन भेद आहेत, १ सराग सम्यग्दर्शन, २ वीतराग सम्यग्दर्शन. Jain Education International १ सराग सम्यग्दर्शन - गुणस्थान ४ ते ६ पर्यंत असंयम किंवा देशसंयम प्रमत्त सकलसंयम याना जे सम्यग्दर्शन असते ते सराग सम्यग्दर्शन म्हटले जाते त्यालाच कोणी आचार्य व्यवहारसम्यग्दर्शन देखील म्हणतात. २ वीतराग सम्यग्दर्शन- वीतरागचारित्राशी अविनाभावी जे सम्यग्दर्शन ते वीतराग सम्यग्दर्शन होय. त्यालाच कोणी आचार्य निश्चय सम्यग्दर्शन म्हणतात. For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy