________________
तत्त्वार्थसार
निश्चय निरपेक्षव्यवहारनय हा व्यवहाराभास होय. तसाच व्यवहार-निरपेक्ष निश्चय हा निश्चयाची खरी साधना करू शकत नसल्यामुळे तो निश्चयाभास म्हटला जातो.
सहा द्रव्याचे सहा अनुयोग रूपाने कथन निर्देशः स्वामित्वं साधनमधिकरणमपि च परिचिन्त्यम् । स्थितिरथ विधानमिति षड् द्रव्याणामधिगमोपायाः ॥५२॥
अर्थ- जीवादिक सहा द्रव्याचे सहा अनुयोगाद्वारे कथन या श्लोकात सूचित केले आहे. कोणत्याही वस्तूचे ज्ञान होण्यासाठी हे अनुयोगद्वार जाणून घेणे आवश्यक आहे. शास्त्रामध्ये जीवादिक द्रव्याचे ६ अनुयोगरूपाने वर्णन केले आहे. १ निर्देश २ स्वामित्व ३ साधन ४ अधिकरण ५ स्थिति ६ विधान. सम्यग्दर्शनाचे ६ अनुयोगद्वारे कथन.
१ निर्देश- सम्यग्दर्शनाचा नामनिर्देश करणे.
२ स्वामित्व - सम्यग्दर्शनाचा स्वामी चतुर्गतीतील संज्ञीभव्य जीव आहे.
३ साधन- निश्चयनयाने त्रिकालशुद्ध आत्मस्वभावरूप कारण परमात्मा याच्या आश्रयाने सम्यग्दर्शन प्राप्त होते. व्यवहारनयानेदेवदर्शन- शास्रस्वाध्याय- गुरूचा उपदेश हे सम्यग्दर्शन प्राप्तीचे बाह्य निमित्त आहे.
४ अधिकरण- निश्चयनयाने सम्यग्दर्शनाचे स्थान आत्माच आहे. व्यवहारनयाने-सम्यग्दर्शनाची प्राप्ती चारही गतीत होते. त्रसनाली बाह्यक्षेत्र अधिकरण आहे.
५ स्थिति- सम्यग्दर्शनाचा काल जघन्य अन्तमुहूर्त आहे. उत्कृष्ट काल ६६ सागर काही अधिक आहे.
६ विधान- सम्यग्दर्शनाचे दोन भेद आहेत. १ निसर्गज व २ अधिगमज.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org