________________
तत्त्वार्थसार
(सकलांशग्राहि ज्ञानं प्रमाणं,) (एकांश पाहिज्ञानं नयs)
नय व प्रमाण हे वस्तूला जाणण्याचे उपाय आहेत. प्रमाणाने वस्तूच्या संपूर्ण अंशाचे ज्ञान होते. प्रमाणाने जाणलेल्या अंशापैकी एकएक अंशाचे विवक्षित नय-निक्षेप अभिप्राय पूर्वक ग्रहण करणे किंवा कथन करणे याला नयज्ञान म्हणतात.
मतिज्ञानादि पाचही ज्ञाने निर्विकल्प आहेत. प्रमाण आहेत. परंतु श्रुतज्ञान हे प्रमाणरूप व नयरूप देखील आहे. श्रुतज्ञान जेव्हा निर्विकल्प अनुभूतिरूप असेल तेव्हा ते प्रमाणज्ञान होय. जेव्हा अभेद वस्तूचे अंशभेदरूपाने ग्रहण किंवा कथन केले जाते तेव्हा ते ज्ञान नयात्मक विकल्पात्मक असते. नय हे विकल्पात्मक श्रुतज्ञानाचे भेद आहेत.
जावदिया वयणविहा तावदिया होंति णयवावा ।
जावदिया णयवादा तावदिया होंति परसमया ॥
जेवढे वचनात्मक विकल्पज्ञान आहे ते सर्व नयज्ञान होय. नयज्ञान विकल्प हा निर्विकल्प वस्तूचे स्वरूप समजण्यासाठी केवळ नयनिक्षेपविधीने वस्तूमध्ये विकल्पभेदाची विवक्षा अभिप्रेत ठेवून विवक्षित भेदरूपाने अभेद वस्तूचे कथन करतो म्हणून, (वस्तु अभेद वचनतै भेद) या उक्तिकथनाप्रमाणे अभेद वस्तूचा भेदरूप कथन व्यवहार हा सर्व परसमय म्हटला जातो. हे वचनात्मक नयभेद कथन वस्तूचे परमार्थस्वरूप नसून वस्तूच्या अभेद स्वरूपाचे हे सूचक आहेत. दिग्दर्शक आहेत. भेदकथन करणारा हा व्यवहारनय आपल्या भेदरूप व्यवहार कथनाचे परमार्थत्व स्थापित करीत नसून भेदकथनाच्या माध्यमातून अभेदात्मक वस्तूचे परमार्थत्व स्थापित करणारा असेल तेव्हा तो व्यवहारनय निश्चयनय सापेक्ष असा सम्यक्व्यवहारनय म्हटला जातो.
तसेच जो निश्चयनय वस्तूचे अभेद स्वरूप समजण्यासाठी प्रथम भेदकथनात्मक व्यवहारनयाचा आश्रय घेऊन भेद कथनाच्या माध्यमातून अभेदात्मक वस्तूचे ज्ञान करून घेतो तो निश्चयनय व्यवहारनय-सापेक्ष सम्यकनय म्हटला जातो.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org