________________
तत्त्वार्थसार
व्यापक आहे. या नयात द्रव्य-गुण-पर्याय, कृत-काल कृत-व्यक्तिकृत भेद विवक्षित नसून सर्वांचे एक महासत् मानून एक व्यक्तिच्या द्वारे अनेक व्यक्तिच्या, द्रव्यद्वारे, गुण-द्वारे, किंवा पर्यायद्वारे संपूर्ण वस्तूचे अभेदरूपाने ग्रहण करणे हा या नपाचा विषय आहे.
२) संग्रहनय- हा द्रव्याथिकनय असल्यामुळे गुणभेद-पर्यायभेदाला गौण करून विशिष्ट जातियुक्त पदार्थाना विशिष्टजातिसंग्रह रूपाने ग्रहण करणे हा या नयाचा विषय आहे.
३) व्यवहारनय- संग्रहनयाने विशिष्टजाति संग्रहरूपाने ग्रहण केलेल्या पदार्थाचे विधिपूर्वक भेद करणे हा व्यवहारनय होय. या तीन नयामध्ये वस्तूच्या कालकृत पर्याय भेदाची विवक्षा नसते म्हणून याला द्रव्याथिकनय म्हणतात.
४) ऋजुसुत्रनय- हा कालकृत पर्यायभेदाची अपेक्षा करतो. एकसमयवर्ती पर्यायच या नयाचा विषय असतो. यद्यापि हा नय लोकव्यवहारदृष्टीने निरर्थक, अप्रयोजनभूत आहे. तथापि येथे नय ज्ञानाचा सूक्ष्म विषय केवढा सूक्ष्म असतो हे दाखविणे या नयाचे मुख्य प्रयोजन आहे. लोकव्यवहारासाठी स्थूल ऋजुसूत्र किंवा अन्यनय प्रयोजनभूत आहेत.
५) शद्वनय- हा नय एकाच पदार्थाचे वाचक जे अनेक एकार्थवाचक शब्द असतात त्याचा निषेध करतो. पण शद्वातील लिंगभेदवचनभेद-पुरुषभेद- कालभेद याला गौण करून एकाच स्त्री पदार्थाचे वाचक जे स्त्री कलत्र दारा असे अनेक लिंगी शद्वातील विरोध न मान । सर्वांचा एकच अर्थ निर्दोष मानतो.
६) समभिरूढनय- एकाच शद्वाचे अनेक अर्थ होत असताना त्यांना गौण करून विवक्षित रूढ-प्रसिद्ध अर्थालाच स्वीकारतो.
७) एवंभूतनय- शद्वाच्या अर्थांस अनुसरून कृतिपरिणत पदार्थालाच त्या शद्वाने संकेत करणे हा सर्वात सूक्ष्म एवंभूतनयाचा विषय आहे.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org