________________
तत्त्वार्थसार
ज्या कथनामध्ये विवक्षित नयनिक्षेपाची विवक्षा अभिप्रेत नाही. जो नय एकांतपणे वस्तूमध्ये विवक्षित धर्माचाच सद्भाव मानतो. प्रतिपक्षी अन्य धर्माचा सद्भाव अभिप्रेत नसतो अशा अन्यनिरपेक्ष नयाला नयाभास मिथ्यानय म्हटले आहे.
कारण वस्तूमध्ये हे परस्पर विरोधी धर्म भिन्न भिन्न विवक्षेने आपला परस्पर अविनाभाव सिद्ध करणारे आहेत. वस्तूमध्ये स्वचतुष्टयाची अस्ति ही वस्तूमध्ये परचतुष्टयाची नास्ति मानल्याशिवाय सिद्ध होत नाही.
'सर्वे एकांतवादाः स्ववैरिणः, परवैरित्वात् '
सर्व एकांतवाद नय आपल्या प्रतिपक्षी धर्माचा निषेध करीत असल्यामुळे ते आपल्या विवक्षित धर्माची देखील सिद्धि करू शकत नसल्यामुळे त्यांना ' स्ववैरी' म्हटले आहे.
वस्तूमध्ये पराची नास्ति मानल्याशिवाय आपली अस्ति सिद्ध होऊ शकत नाही. वस्तूमध्ये पर्यायधर्माचा अनित्यपणा मानल्याशिवाय द्रव्यधर्म नित्य राहू शकत नाही. पर्यायरूपाने परिणमनशील राहून द्रव्यधर्मरूपाने ध्रुव राहणे हा वस्तूचा वस्तुगत स्वभाव आहे.
'निरपेक्षया नया मिथ्या, सापेक्षा वस्तु तेऽर्थकृत्' __ प्रतिपक्ष निरपेक्ष नय हे मिथ्या म्हटले जातात. प्रतिपक्ष सापेक्षनय त्या सर्वांचा समन्वय, समुदाय हीच अर्थक्रियाकारी वस्तु म्हटली जाते. तेथे अभेद वस्तूचे परमार्थस्वरूप असते.
उत्तरोत्तर नयाच्या विषयामध्ये सुक्ष्मपणाची तर तमता
या सात नयांचा क्रमनिर्देश यथाक्रम सांगण्यात उत्तरोत्तर त्यांचा विषय सूक्ष्म-सूक्ष्म आहे हे सूचित केले आहे.
१) नैगमनय- हा पदार्थ व पदार्थातील द्रव्यधर्म, गुणधर्म, पर्यायधर्म, या सर्वांचे एक महासत् रूपाने ग्रहण करणारा असल्यामुळे तो
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org