________________
तत्वार्थसार
एवं भूतनय यामध्ये प्रामुख्याने शद्वाची प्रधानता असते म्हणून ते तीन नय शद्वनय म्हटले जातात.
१ नैगम-नय लक्षण व दृष्टांत अर्थ संकल्पमात्रस्य ग्राहको नैगमो नयाः । प्रस्थौदनादिकस्तस्य विषयः परिकीर्तितः ॥ ४४ ॥
अर्थ-- पदार्थाच्या संकल्प मात्रावरून पदार्थाचे ग्रहण करणारा नय तो नैगमनय होय. जसे प्रस्थं आनेतुं गच्छामि । प्रस्थ (लाकडाचेमाप) तयार करण्याचा संकल्प करून लाकूड आणण्यास जात असताना मी प्रस्थ आणण्यास जात आहे असे म्हणणे. भात करण्याचा संकल्प करून तांदूळ शिजवित असताना मी भात शिजवित आहे (ओदनं पच्चामि) असे म्हणणे.
नैगमाचे तीन भेद आहेत १ भूत नैगम, २ भावी नैगम' ३ वर्तमान नेगम.
१ भूतकालीन क्रियेचा वर्तमान कालामध्ये संकल्प करणे भूतनैगम.
२ भावीकालीन पर्यायाचा वर्तमान पर्यायामध्ये संकल्प करणे भावीनैगम.
३ वर्तमान चालू क्रियेचा पूर्ण क्रियेमध्ये संकल्प करणे वर्तमान नैगम.
२ संग्रहनय लक्षण-दृष्टांत भेदेऽप्यैक्यमुपानीय स्वजातेरविरोधतः । समस्तग्रहणं यः स्यात् स नयः संग्रहो मतः ॥ ४५ ।।
अर्थ- अनेक पदार्थामध्ये व्यक्तिगत भेद असताना देखील त्याला . गौण करून विवक्षित जालि अपेक्षेने विरोध न येईल अशी एकता स्थापित करून अनेक पदार्थांना एकजातिसंग्रहरूपाने ग्रहण करणे तो संग्रहनय होय. अनेक मनुष्याना मनुष्य या एक नावाने संबोधित करणे.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org