________________
तत्त्वार्थसार
अर्थ- व्यावृत्ति व्यतिरेक विशेष पर्याय हे सर्व एकार्थ वाचक आहेत. पर्यायरूप एक एक अंश हा ज्या नयाचा विषय असतो त्यास पर्यायार्थिक नय म्हणतात. द्रव्यामध्ये सामान्यधर्म, द्रव्यधर्म व विशेष पर्यायधर्म हे मुख्य दोन भेद आहेत. त्याचे पोट भेद अनेक आहेत. त्याना विषय करणाया नयाचे देखील मुख्य दोन भेद आहेत. त्यांचे पोटभेद अनेक आहेत.
-
-
द्रव्यार्थिक नयाचे पोटभेद शुद्धाशुद्धार्थसंग्राही त्रिधा द्रव्याथिको नयः । नैगम: संग्रहश्चैव व्यवहारश्च स स्मृतः ॥ ४१।।
अर्थ - द्रव्यार्थिक नय तीन प्रकारचा आहे. १ नैगम २ संग्रह ३ व्यवहार. पदार्थामध्ये सामान्य धर्म दोन प्रकारचा आहे.
Jain Education International
३३
१ विस्तार सामान्य किंवा तिर्यक् सामान्य २ आयत सामान्य किंवा ऊर्ध्वता सामान्य तिर्यक् सामान्याला सदृश सामान्य म्हणतात. ऊर्ध्वता सामान्याला स्वरूप सामान्य म्हणतात. सामान्य दृष्टी ही अभेद दृष्टी - शुद्ध दृष्टी म्हटली जाते. विशेष दृष्टी ही भेद दृष्टी - अशुद्ध दृष्टी - म्हटली जाते. एकाच वस्तूमध्ये द्रव्य - गुणपर्याय रूपाने कथंचित् भेद असला तरी एकाद्रव्याच्या सर्व गुण पर्यायामध्ये एकद्रव्यरूप, अन्वय अभेदरूप असतो म्हणून एका द्रव्याच्या कोणत्याही गुण-पर्याय भेदाला अभेद एक द्रव्यरूपाने ग्रहण करणे याला शुद्ध नैगम नय म्हणतात. एका द्रव्याच्या भूत-भावी - वर्तमान तीन पर्यायामध्ये यद्यपि पर्याय रूपाने भेद असतो तथापि भेदाला गौण करून त्या भेदामध्ये द्रव्यरूपाने अभेदाला ग्रहण करणे तो नैगम नय म्हटला जातो.
अनेक वस्तूमध्ये व्यक्ति अपेक्षेने यद्यपि भेद असतो तथापि त्या सर्व व्यक्तीमध्ये एक जाति अपेक्षेने जो अभेद असतो त्याला तिर्यक् सामान्य म्हणतात. हे तिर्यक् सामान्य अनेकामध्ये एकतारूपाने बुद्धीने कल्पित केले असते म्हणून याला अशुद्ध सामान्य म्हणतात. व्यक्तिभेदाला एक जाति अभेद रूपाने ग्रहण करणारा जो नय त्याला संग्रहनय म्हणतात.
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org