________________
तत्त्वार्थसार
३१
अर्थ- मति-श्रुत-अवधि ज्ञाने जेव्हा मिथ्यात्वाने सहित असतात तेव्हा ती ज्ञाने मिथ्याज्ञाने म्हटली जातात. मिथ्यात्वामुळे ज्ञानामध्ये प्रमाणता रहात नाही.
मिथ्याज्ञानामध्ये अप्रमाणता कशी असते ?
अविशेषात् सदसतो रूपलब्धेर्यदृच्छया।
यत उन्मत्तवज्ज्ञानं न मिथ्यादृशोऽञ्जसा ॥३६॥ अर्थ- दारू पिऊन उन्मत्त झालेल्या माणसा प्रमाणे मिथ्यादृष्टीचे ज्ञान हे प्रमाण म्हटले जात नाही कारण त्याला पदार्थाच्या सद्-ध्रुव धर्माचे असत्-अध्रुव धर्माचे, द्रव्यधर्माचे व पर्यायधर्माचे भेदज्ञान नसते तो वस्तूच्या पर्यायालाच वस्तु मानतो. 'पर्यायमूढा हि परसमया' या प्रमाणे पर्यायालाच द्रव्य मानणारे पर्यायमूढ मिथ्यादृष्टि म्हटले जातात. मिथ्यादृष्टीचे ज्ञानात स्वरूप विपर्यास, भेदाभेद विपर्यास, कारणविपर्यास इ. विपरीत मान्यता असते. तो राग द्वेषादि अचेतन विभाव भावाला स्वभाव समजतो, शरीर व आत्मा यात भेद असताना अभेद समजतो व बंधाच्या कारणाला संवर निर्जरा मोक्षाचे कारण समजतो.
नय स्वरूप वस्तुनोऽनन्त धर्मस्य प्रमाणव्यंजितात्मनः ।
एकदेशस्य नेता यः स नयोऽनेकधा मतः ।।३७।।
अर्थ- वस्तु अनंतधर्मात्मक आहे. प्रमाणाने वस्तूचे अनंतधर्म समुदायात्मक अभेद स्वरूप जाणून त्याच्या एक एक अंश धर्मभेदाचे विवक्षित नय-निक्षेपपूर्वक ग्रहण करणे त्यास नयज्ञान म्हणतात.
वस्तूचा द्रव्यधर्म सत् रूप, ध्रुवरूप, एकरूप, अभेदरूप असतो. वस्तूचे पर्यायधर्म असतरूप, क्षणिक सत्रूप, अध्रुवरूप, अनेकरूप भेदरूप असतात. म्हणुन वस्तूच्या या परस्पर विरोधी द्रव्य-पर्यायधर्माचे ग्रहण करणारे नय देखील दोन प्रकारचे आहेत. नयाचे पोटभेद अनेक प्रकारचे आहेत.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org