________________
३०
तत्वार्थसार
समाधान- मोहनीय कर्मामुळे क्षायोपशमिक ज्ञानामध्ये कथंचित् आसक्ति उत्पन्न होते. जसा जसा मोहनीयकर्माचा अभाव होत जातो तशी तशी ज्ञानातील आसक्ति कमी होत जाते. क्षीणमोह गुणस्थानात मोहाचा अभाव होतो तरी ज्ञानाची अल्पज्ञता छद्मस्थता असते. मोहाचा अभाव झाल्यानंतर ज्ञानावरणादि तीन घातिकर्मांचा क्षय होताच या मतिज्ञानावरणादिकांचा देखील युगपत् क्षय होऊन ज्ञान निर्मल व पूर्ण बनते. ज्ञानाची मलिनता व क्रमवर्तीपणा-अल्पज्ञता ही मोहनीयाच्या अभावात नष्ट होते. त्यामुळे ज्ञान निर्मल व पूर्ण युगपत् होते. मोहाचा पूर्ण नाश होऊन देखील उपयोगाची स्थिरता ठेवण्याचे सामर्थ्य ज्ञानावरण, दर्शनावरण, व अंतराय यांचा क्षय झाल्याशिवाय प्राप्त होत नाही.
एका जीवास युगपत् किती ज्ञाने असतात
जीवे युगपदेकस्मिन्नेकादीनि विभाजयेत् ।
ज्ञानानि चतुरन्तानि न तु पंच कदाचन ॥३४॥
अर्थ- एका जीवामध्ये युगपत् एक पासून विभाजित करून एकदोन-तीन-चार पर्यंत ज्ञाने असू शकतात. एका जीवास युगपत् पाच ज्ञाने असू शकत नाहीत. एका जीवास युगपत् एक ज्ञान केवल ज्ञान असते. दोन ज्ञाने मति-श्रुत ज्ञाने असतात. तीन ज्ञाने मति-श्रुत-अवधि किंवामति-श्रुत-मनःपर्यय. परंतु पाचही ज्ञाने युगपत् असू शकत नाहीत. कारण जेथे एक क्षायिक केवलज्ञान असते तेथे बाकीची क्षयोपशम ज्ञाने असू शकत नाहीत. ही क्षायोपशमिक ज्ञाने क्रमवर्ती असल्यामुळे उपयोगरूपाने एकावेळी एकच ज्ञान असते पण लब्धि क्षयोपशमरूपाने जास्तीत जास्त चार ज्ञाने युगपत् असू शकतात.
एका जीवास युगपत् चार ज्ञाने असू शकतात
मतिः श्रुतावधी चैव मिथ्यात्वसमवायिनः । मिथ्याज्ञानानि कथ्यन्ते न तु तेषां प्रमाणता ।।३५।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org