________________
तत्वार्थसार
अर्थ - केवलज्ञान इंद्रियादि परद्रव्याच्या सहायाची अपेक्षा ठेवीत नाही. आत्मशक्ति स्वभावाने होते - निरावरण आहे. कर्माच्या अभावात प्रगट होते. सर्व पदार्थाना युगपत् जाणते म्हणून क्रमवर्ती नाही. घातिकर्माचा क्षय झाला असताना प्रगट होते. केवलज्ञान सर्व ज्ञेय पदार्थाना युगपत् जाणते म्हणून ते सर्वगत म्हटले जाते.
मतिज्ञानादिकाचे विषय
मतेविषयसम्बन्धः श्रुतस्य च निबुध्यताम् ॥३१॥ असर्वपर्ययेष्वत्रच सर्वद्रव्येषु धी धनैः ॥
सर्वपर्ययेविष्टो रूपिद्रव्येषु सोऽवधिः || ३२ ।। स मन:पर्ययस्येष्टोऽनन्तांशेऽवधिगोचरात् । केवलस्याखिलद्रव्य पर्यायेषु च सूचित ॥३३॥
२९
अर्थ- मतिश्रुतज्ञानाचा विषय संबंध सर्वद्रव्याचे कांही पर्याय आहेत अवधिज्ञानाचा विषय रूपी द्रव्याचे काही पर्याय आहेत. मन:पर्यय ज्ञानाचा विषय अवधिज्ञान गोवर विषयापेक्षा अत्यंत सूक्ष्म मनातील रूपी विचार. केवलज्ञानाचा विषय सर्व पदार्थ व त्यांचे त्रिकालवर्ती सर्व पर्याय विषय आहे. मतिज्ञानादि चार ज्ञाने क्षयोपशमिक आहेत क्रमवर्ती आहेत. केवलज्ञान हे क्षायिकज्ञान आहे. अक्रमवर्ती युगपत् सर्व पदार्थाना व त्यांच्या त्रिकालवर्ती सर्व अवस्थाना युगपत् जाणते.
Jain Education International
प्रश्न- यद्यपि मतिज्ञानादिक क्षायोपशमिक ज्ञाने आपापल्या कर्माच्या क्षयोपशमात प्रगट होतात. मतिज्ञान मतिज्ञानावरणाच्या क्षयोपशमात, श्रुतज्ञान श्रुतज्ञानावरण कर्माच्या क्षयोपशमात, अवधिज्ञान अवधिज्ञानावरणाच्या क्षयोपशमात. मन:पर्यय ज्ञान मन:पर्यय ज्ञानावरणाच्या क्षयोपशमात प्रगट होते तथापि या क्षायोपशमिक ज्ञानात त्या त्या ज्ञानावरणाचा पूर्ण अभाव होत नाही. क्षयोपशमिकरूपाने देशघातीचा उदय विद्यमान असतो त्यामुळे ही क्षयोपशमिक ज्ञाने पूर्ण नसतात. चारही ज्ञानावरणाचा क्षय केवलज्ञानाचे वेळी केवलज्ञानाच्या क्षयाबरोबर होतो - असे कां ?
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org