________________
तत्त्वार्थसार
१ ऋजुमति-दुसऱ्याच्या मनातील सरळ मन-वचन-कायेने चिंतित रूपी पदार्थाना आत्मिक शक्तीने प्रत्यक्ष जाणणे ते ऋजुमति मनःपर्यय ज्ञान होय.
२ विपुलमति- दुसऱ्याच्या मनातील वक्र मन-वचन कायेने चिंतित, अचितित, अर्धचिंतित, पूर्णचितित, भाविचिंतित रूपी पदार्थाना प्रत्यक्ष जाणणे ते विपुलमति मनःपर्यय ज्ञान होय.
ऋजुमति-विपुलमतीमध्ये विशेषता अवधि व मनःपर्यय ज्ञानातील विशेषता विशुध्ध प्रतिपाताभ्यां विशेषश्चिन्त्यतां तयोः । स्वामि-क्षेत्र विशुद्धिभ्यो विषयाश्च सुनिश्चिताः ॥२९॥ स्याद् विशेषोऽवधिज्ञानमनःपर्ययबोधयोः ॥ (षट्पदी) अर्थ- ऋजुमती पेक्षा विपुलमति ज्ञानाची विशुद्धि क्षयोपशम शक्ती अधिक असते. ऋजुमति मनःपर्ययज्ञान प्रतिपाति आहे अर्थात् ते नष्ट होऊन जीव मति-श्रुत ज्ञानी होतो परंतु विपुलमति मन:पर्ययज्ञान नष्ट होत नाही अप्रतिपाति आहे. त्यानंतर नियमाने केवलज्ञानाची प्राप्ति होते.
अवधिज्ञान व मनःपर्यय ज्ञानातील विशेषता-- अवधिज्ञाना पेक्षा मनःपर्यायज्ञानाची विशुद्धि क्षयोपशम शती अधिक असते. क्षेत्राच्या अपेक्षेने-अवधिज्ञानाचे क्षेत्र सर्वलोक आहे. परंतु मनःपर्ययज्ञानाचे क्षेत्र अडीचद्वीप प्रमाण मनुष्यलोकच क्षेत्र आहे. अवधिज्ञानाचा स्वामी चारही गतीतील जीव असू शकतो. परंतु मनःपर्ययज्ञानी मनुष्य गतीतील फक्त संयमलिंगधारी मुनीच असतात. अवविज्ञानाचा विषय जास्तीत सूक्ष्म कार्म गवर्गणा विषय होऊ शकतो. मनःपर्यय ज्ञानाचा विषय त्याहीपेक्षा सूक्ष्म मनातील रूपी विचार विषय होतात.
केवलज्ञान स्वरूप असहायं स्वरूपोत्थं निराबरणयक्रमं ।। ३७ घातिकमायोत्पन्नं केवलं सर्वभावगं ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org