SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 72
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्त्वार्थसार ६ हीयमान- जे ज्ञान कमी होत जाते ते हीयमान. हे अवधिज्ञान उत्पन्न होऊन नष्ट ही होऊ शकते किंवा नष्ट न होता वाढत जात मनःपर्य यज्ञान केवलज्ञानरूप देखील होऊ शकते. यांचे तीन भेद आहेत. १ देशावधि २ परमावधि ३ सर्वावधि. अवधिज्ञानाचा विषय द्रव्यक्षेत्र-काल-भाव यांच्या विशिष्ट मर्यादेत असतो म्हणून यास अवधिज्ञान किंवा मर्यादाज्ञान म्हणतात. याचे प्रत्येकी जघन्य-मध्यम-उत्कृष्ट असे तीन-तीन भेद आहेत. अवधिज्ञानाचे दोन भेद आहेत. १) भवप्रत्यय २) क्षयोपशमहेतुक अवधिज्ञानाचे स्वामी देवानां नारकाणां च स भवप्रत्ययो भवेत । मानुषाणां तिरश्चां च क्षयोपशमहेतुकः ॥२७॥ अर्थ- देव व नारकी याना भवप्रत्यय अवधिज्ञान असते. मनुष्य व तियं च यांना क्षयोपशमहेतुक अवधिज्ञान होऊ शकते. देव-नारकी यांचे भवप्रत्यय अवधिज्ञान देखील क्षयोपशमहेतुकच असते पण त्यांचा भव त्या विशिष्ट क्षयोपशमाचे कारण असतो. द ते भवप्रत्यय अवधिज्ञान सर्व नारकी-देवाना होते. क्षयोपक्षमहेतुक अवधिज्ञान मनुष्य व तिर्यंच यापैकी काही विशिष्ट क्षयोपशमधारी जीवाना होते सर्वांना होत नाही. ४ मनःपर्ययज्ञानाचे लक्षण व भेद परकीय मनःस्यार्थज्ञानमन्यानपेक्षया । स्यान्मनः पर्ययो भेदौ तस्यर्जुविपुले मती ॥२८॥ अर्थ- इंद्रियादिकाची अपेक्षा न ठेवता आत्मिक शक्तीने ईहामतिज्ञान पूर्वक दुसन्याच्या मनातील रूपी विचार व तद्विषयक रूपी पदार्थ यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणे यास मनःपर्यय ज्ञान म्हणतात. मन:पर्यय ज्ञानाचे २ भेद आहेत. १ ऋजमति २ विपुलमति. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy