SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 71
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार १९ पूर्वज्ञान- वस्तुज्ञाना नंतर अक्षरवृद्धि क्रमाने अनेक पदसंघात आदिकांची वृद्धि होऊन जे ज्ञान होते ते पूर्वज्ञान होय. २० पूर्वसमासज्ञान- पूर्वज्ञानाच्या नंतर उत्कृष्ट श्रुतज्ञानाच्या पूर्वी मधले जे विकल्प ते पूर्व समासज्ञान होय. __३ अवधिज्ञान व त्याचे भेद परापेक्षा विना ज्ञानं रूपिणां भणितोऽवधिः ॥२५॥ अनुगोऽननुगामी च तदवस्थोऽनवस्थितः ।। वधिष्णु ीयमानश्च षड्विकल्पः स्मृतोऽवधिः ॥२६।। अर्थ- जे ज्ञान इंद्रिय व मनाची अपेक्षा न ठेवता आत्मिक शक्तीने द्रव्य-क्षेत्र-काल-भाव याच्या मर्यादेमध्ये रूपी पदार्था ला स्पष्ट जाणते त्यास अवधिज्ञान म्हणतात. . अवधिज्ञान ६ प्रकारचे आहे. १ अनुगामी २ अननुगामी ३ अवस्थित ४ अवस्थित ५ वर्धमान ६ हीयमान. १ अनुगामी- जे ज्ञान मर्यादित क्षेत्राच्या बाहेर देखील जीवाबरोबर जाते, एका भवातून दुसऱ्या भवात देखील जीवाबरोवर जाते ते अनुगामी अवधिज्ञान होय. जे दीर्घ काळ टिकते ते अनुगामी होय. २ अननगामी- जे मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जीब गला तर त्याच्या बरोबर जात नाही, नष्ट होते, पुनः जीव जर त्या क्षेत्रात आला तर पुनः उत्पन्न होते त्यास अननुगामी अवधिज्ञान म्हणतात. __३ अवस्थित- जे ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर जेवढ्याचे तेवढे राहते कमी-जास्त वाढत नाही किंवा कमी-जास्त होत नाही त्यास अवस्थित अवधिज्ञान म्हणतात. ४ अनवस्थित- जे ज्ञान कमी किंवा जास्त होते ते अनवस्थित होय. ५ वर्धमान - जे ज्ञान उतरोत्तर वाढत जाते ते वर्धमान होय. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy