________________
तत्त्वार्थसार
२५
७ संघात- पदज्ञानानंतर एक एक अक्षरवृद्धिक्रमाने संख्यत हजार पदवृद्धि होऊन उत्पन्न होणारे ज्ञान ते संघात ज्ञान होय. यामध्ये चार गती पैकी एका गतीचे वर्णन असते.
८ संघात समास- संघात ज्ञानाचे वर प्रतिपत्ति ज्ञानाच्यापूर्वी जे मधले विकल्प त्यास संघात समासज्ञान म्हणतात.
९ प्रतिपत्तिक- संघात ज्ञानाचे एक एक अक्षरवृद्धि क्रमाने संख्यात हजार संघाताची वृद्धि होऊन जे ज्ञान होते ते प्रतिपत्तिक श्रुतज्ञान होय. यामध्ये चार गतींचे विशेष वर्णन असते.
१० प्रतिपत्तिक समास- प्रतिपत्तिक ज्ञानाचे वर अन योग ज्ञानाच्या पूर्वी जे मधले विकल्प ते प्रतिपत्तिक समासज्ञान होय.
११ अनुयोगज्ञान- प्रतिपत्तिक ज्ञानानंतर एक एक अक्षरवृद्धि क्रमाने संख्यात हजार प्रतिपत्तिक वृद्धि होऊन जे ज्ञान उत्पन्न होते त्यास अनुयोग ज्ञान म्हणतात. यात चौदा मार्गणेचे विस्तृत वर्णन आहे.
१२ अनुयोग समास- अनुयोग ज्ञानाचे नंतर प्राभृत-प्राभूत ज्ञानाचे पूर्वीचे जे मधले विकल्प भेद ते अनुयोग समास ज्ञान होय.
१३ प्राभृत प्राभूत ज्ञान- अनुयोग ज्ञानानंतर एक एक अक्षरवृद्धि क्रमाने चार अनुयोगाची वृद्धि होऊन जे शान होते ते प्राभृत-प्राभृत ज्ञान होय. प्राभृत ज्ञानाच्या एक अधिकाराला प्राभृत-प्राभृत म्हणतात.
१४ प्राभूत प्राभूत समास- प्राभृत ज्ञानाचे वर प्राभृत ज्ञानाचे पूर्वीचे जे मधले विकल्प ते प्राभृत प्राभृत समास ज्ञान होय.
१५ प्राभूत ज्ञान- प्राभृत प्राभृत ज्ञानाचेवर एक एक अक्षरवृद्धि क्रमाने २४ प्राभृत प्राभृत अधिकार म्हणजे एक प्राभृत ज्ञान होय.
१६ प्राभूत समास-प्राभूत ज्ञानाचे वर वस्तुज्ञानाच्या पूर्वीचे जे मधले विकल्प ते प्राभूत समास ज्ञान होय.
१७ वस्तुज्ञान-- प्राभूत ज्ञानाचे वर एक एक अक्षरवृद्धि क्रमाने २० प्राभृत अधिकार म्हणजे एक वस्तु अधिकार ज्ञान होय.
१८ वस्तुसमास- वस्तुज्ञाना नंतर पूर्वज्ञानाचे पूर्वीचे जे मधले विकप ते वस्तुसमाग ज्ञान होय.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org