________________
२४
तत्त्वार्थसार
( श्रुतज्ञानप्रभेदप्ररूपणायां लब्ध्यक्षरश्रुतज्ञानं षोढा प्रविभक्तं तद्यथा-चक्षुःश्रोत्र-प्राण-रसन-स्पर्शन-मनो-लब्ध्यक्षरं इत्यर्थः) यावरून हे लब्ध्यक्षरात्मक श्रुतज्ञान सूक्ष्म निगोदी अपर्याप्त एकेंद्रियापासून संज्ञीपंचेंद्रिय लब्ध्यपर्याप्तक जीवापर्यंत पाच इंद्रिये व मन यांच्या द्वारे असू शकते. _ (मतिपूर्वं श्रुतं) श्रुतज्ञान हे मतिज्ञान पूर्वकच होते. मतिज्ञान झाल्याशिवाय श्रुतज्ञान होत नाही. श्रुतज्ञानाचे दोन भेद आहेत. १ अक्षरात्मक (शब्दात्मक) २ अनक्षरात्मक. १ अक्षरात्मक श्रुतज्ञान हे वर्ण-शब्दात्मक ज्ञान संज्ञी जीवालाच होते म्हणून वर्ण-शब्दात्मक आगम ज्ञानाला देखील श्रुतज्ञान म्हणतात. हे ज्ञान कर्णेद्रियानेच होते पण अनक्षरात्मक श्रुतज्ञान हे इतर इंद्रियानी देखील होते. मंगीला घ्राणेन्द्रियाने साखरेचा गोड सुगंध वास येतो. त्यानंतर येथे साखर आहे, त्या दिशेने गमन करावे असे विशेष विज्ञान त्या घ्राणेन्द्रियाने होते ते श्रुतज्ञान होय.
१ पर्यायज्ञान- सूक्ष्मनिगोदिया लब्ध्यपर्याप्तक जीवाला उत्पत्तीच्या प्रथम समयी होणारे लब्ध्यक्षर नामक सर्वजघन्य श्रतज्ञान त्यास पर्यायज्ञान म्हणतात. हे लब्ध्यक्षर नामक श्रुतज्ञान निरावरण असते. लब्ध्यक्ष र ज्ञानावरण कर्म पर्यायसमाग ज्ञानावर आवरण टाकते.
२ पर्यायसमास-पर्यावज्ञानाच्यावर षट्स्थान पतित वृद्धि क्रमाने अक्षर ज्ञानाच्या खालचे जे ज्ञान ते पर्यायसमास ज्ञान होय.
३ अक्षरज्ञान- पर्याय समास ज्ञानानंतर एक अक्षर वृद्धिरूप अक्षरज्ञान होय.
४ अक्षरसमास- अक्षरज्ञानाचेवर क्रमाने एक एक अक्षराची वृद्धि होत पदज्ञानाच्या पूर्वीचे जे ज्ञान ते अक्षरसमास ज्ञान होय.
५ पदज्ञान- अक्षरसमास ज्ञानाचेवर क्रमाने एक अक्षराची वृद्धि होऊन जे ज्ञान उत्पन्न होते ते पदज्ञान होय.
६ पदसमास- पदज्ञानाचेवर क्रमाने एक एक पदाची वृद्धि होत संघात ज्ञानाचे पूर्वीचे जे ज्ञान ते पदसमास ज्ञान होय.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org