________________
तत्त्वार्थसार
२३
अंगबाह्य श्रुतज्ञानाचे १४ भेद- १ सामायिक, २ चतुर्विंशति स्तवन, ३ वंदना, ४ प्रतिक्रमण, ५ वैनयिक, ६ कृतिकर्म, ७ दशवैकालिक, ८ उत्तराध्ययन, ९ कल्प व्यवहार, १० कल्पाकल्प, ११ महाकल्प, १२ पुंडरीक, १३ महा पुंडरिक, १४ निषिद्धिका.
श्रुतज्ञान' व केवलज्ञान हे विषयाच्या अपेक्षेने समान आहेत. श्रुतज्ञान हे संपूर्ण पदार्थाचे ज्ञान करून देते. या दोहोमध्ये फरक एवढाच आहे की, केवलज्ञान हे सर्व पदार्थाना युगपत् प्रत्यक्ष जाणते. श्रुतज्ञान हे सर्व पदार्थांना क्रमाने परोक्ष जाणते.
सर्वजघन्य श्रुतज्ञान लब्ध्यक्षरात्मक आहे. लब्धि म्हणजे क्षयोपशम प्राप्ति अक्षर म्हणजे अविनाशी अर्थात् हे लब्ध्यक्षररूप श्रुतज्ञान अविनाशी निरावरण असते. हा संपूर्ण केवलज्ञानाचा एक अंश शुद्ध निरावरण असतो. हे नित्य प्रकाशमान असते. याच्या पुरुषार्थबलानेच जीव आपल्या अतरंग शक्तिसामर्थ्याने क्रमाने पूर्ण श्रुतज्ञानापर्यंत व केवलज्ञानापर्यंत ज्ञानवृद्धि करू शकतो. ज्ञान प्रगट होण्यासाठी ज्ञानावरण कर्माचा क्षय, क्षयोपशम हे बाह्य निमित्त असते. ज्ञानाचा उघाड होण्यासाठी अंतरंग शक्तिसामर्थ्याचा सद्भाव व बाह्य निमित्त असते. ____ हा घट आहे, हा पट आहे, हा काळा आहे, हा गोरा आहे हे सर्व विशेष विज्ञान श्रुतज्ञान म्हटले जाते. डोळ्याने घट पाहिला हे इंद्रियजन्य मतिज्ञान आहे. परंतु या पदार्थाला घट म्हणतात हे जे विशेष विज्ञान-परिज्ञान होते ते परोपदेश पूर्वक-आगम ज्ञान पूर्वक होते म्हणून याला श्रुतज्ञान म्हणतात.
टीप १- भेदः साक्षात् असाक्षाच्च. टीप २- सुहमणिगोद अपवजत्तयस्स जादस्स पढमसमयम्हि ।
लद्धक्खरं च णाणं णिच्चधाई णिरावरणं ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org