________________
तस्वार्थसार
विशेषसत्ता- सामान्यसत्ता प्रतिभासरूप दर्शन झाल्यानंतर पदार्थाच्या विशेष सत्तेचा ( अवांतरसत्तेचा ) जो प्रतिभास होतो ती ज्ञानचेतना होय. हा विशेष प्रतिभास विशिष्ट पदार्थाच्या आकार स्वरूप असतो म्हणून ज्ञानाला सविकल्प साकार म्हटले आहे.
१) अवग्रह-सामान्य प्रतिभासरूप दर्शन झाल्यानंतर विशेष प्रतिभासरूप जे पदार्थाचे आद्य ग्रहण त्याला अवग्रह म्हणतात.
२) ईहाज्ञान-अवग्रह ज्ञान झाल्यानंतर तो पदार्थ कोण असावा अशी पदार्थाला विशेष जाणण्याची जिज्ञासा, उत्कंठा त्याला ईहाज्ञान म्हणतात.
प्रश्न- ईहाज्ञान व संशय ज्ञान यात काय फरक आहे ?
उत्तर- संशय ज्ञानामध्ये 'हा की तो' अशाप्रकाराने उभयकोटीला स्पर्श करणारे संशयरूप ज्ञान असते म्हणून संशयज्ञान मिथ्याज्ञान आहे. पण ईहाज्ञानामध्ये अवग्रहाने जाणलेल्या पदार्थांविषयी हा पदार्थ अमुक असावा अशी विशेष जाणण्याची उत्कंठा-जिज्ञासा असते म्हणून ईहाज्ञान हे सम्यक्ज्ञान आहे.
३) अवाय ज्ञान- ईहाज्ञानाने जाणलेल्या पदार्थाचे विशेप निश्चयात्मक जे ज्ञान होते ते अवाय ज्ञान होय.
४) धारणा ज्ञान- अवाय ज्ञानाने जाणलेल्या पदार्थाचे कालान्तराने विस्मरण न होणान्या ज्ञानाच्या संस्काराला धारणा ज्ञान म्हणतात.
(संस्कारःधारणा । तस्य उद्बोधः प्रबोधः सः निबन्धनं यस्याः सा तदित्याकारा स्मृतिः)
धारणा ज्ञान जनित संस्कार ज्याला कारण आहे असे पूर्व अनुभूत पदार्थाचे 'तो' इत्याकारक जे ज्ञान त्याला स्मृति म्हणतात.
केवलज्ञान हे क्षायिकपूर्ण ज्ञान असल्यामुळे ते ज्ञान सर्वथा सम्यग्ज्ञान स्वरूप आहे परंतु मतिज्ञान आदि चार क्षायोपशमिक ज्ञानाला
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org