SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 64
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्त्वार्थसार १२) अध्रुव- पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे अस्थिर पदार्थाच्या ज्ञानाला अध्रुव अवग्रह म्हणतात. या प्रमाणे अवग्रह-ईहा-अवाय-धारणा ज्ञानाचे विषयरूप पदार्थांच्या अपेक्षेने प्रत्येकाचे १२ भेद आहेत. व्यंजनावग्रह फक्त चार इंद्रियानी ( स्पर्शन-रसन-घ्राण-श्रोत्र ) होतो. अर्थावग्रह व ईहादि ज्ञाने ६ इंद्रियानी होतात म्हणून १) व्यंजनावग्रहाचे (१२ x ४) = ४८ भेद होतात. २) अर्थावग्रहाचे (१२ x ६) ३) ईहाज्ञानाचे (१२ x ६) = ७२ ४) अवाय-ज्ञानाचे (१२ x ६) = ७२ ५) धारणा ज्ञानाचे (१२ x ६) = ७२ असे एकूण मतिज्ञानाचे ३३६ भेद होतात. ज्ञानाला दुसरे नाव प्रतिभास किंवा चेतना असे आहे. चेतनेचे २ भेद आहेत. १) दर्शन चेतना २) ज्ञान चेतना. १) दर्शन चेतना- ज्यामध्ये वस्तूचा विशेष प्रतिभास न होता सामान्य सन्मात्र प्रतिभास होतो त्याला दर्शन चेतना म्हणतात. यालाच सामान्य प्रतिभास किंवा निर्विकल्प (निराकार) दर्शन म्हणतात. जसे काही तरी आहे. २) ज्ञान चेतना-ज्यामध्ये वस्तूचा विशेष प्रतिभास होतो त्यास ज्ञान चेतना म्हणतात. यालाच विशेष प्रतिभास किंवा सविकल्प (साकारज्ञान म्हणतात.) वस्तूमध्ये सामान्यसत्ता व विशेषसत्ता असे दोन धर्म असतात. १) सामान्यसत्ता- सर्व पदार्थामध्ये वस्तुनिष्ठ असणारा जो सत्तासामान्यरूप सदृशधर्म त्याला सामान्यसत्ता किंवा महासत्ता म्हणतात. सर्वप्रथम 'कांहीतरी आहे ' असा वस्तूचा सामान्यसत्तारूप महासत्तारूप निराकार-निर्विकल्प प्रतिभास होतो त्यास दर्शन म्हणतात. म्हणून दर्शनाला निराकार म्हणतात. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy