________________
तत्त्वार्थसार
१ अव्यक्त- अस्पष्ट पदार्थाच्या अवग्रहाला व्यंजनावग्रह म्हणतात.
२ व्यक्त स्पष्ट अवग्रहाला अर्थावग्रह म्हणतात. चक्षु व मन यानी अर्थावग्रह होतो. व्यंजनावग्रह होत नाही. बाकीच्या चार इंद्रियांनी प्रथम अस्पष्टरूप व्यंजनावग्रह होतो. नंतर स्पष्टरूप अर्थावग्रह होतो. व्यंजनावग्रह झाल्याशिवाय अर्थावग्रह होत नाही. अर्थावग्रह झाल्याशिवाय पुढील ईहादिक ज्ञाने होत नाहीत.
___ अवग्रहादि ज्ञानाचे विषयभूत पदार्थाच्या अपेक्षेने १२ भेद आहेत. १) बहु, २) बहुविध, ३) क्षिप्र, ४) अनिसृत, ५) अनुक्त, ६) अध्रुव यांचे प्रतिपक्षभूत ७) एक, ८) एकविध, ९) अक्षिप्र, १०) निःसृत, ११) उक्त १२) ध्रुव..
१) एक-एक पदार्थाच्या ज्ञानाला एकावग्रह म्हणतात. २) बहु-अनेक पदार्थाच्या ज्ञानाला अनेकावग्रह म्हणतात. ३) एकविध-एकप्रकारच्या अनेक पदार्थांच्या ज्ञानाला एकविध अवग्रह म्हणतात.
४) बहुविध-अनेक प्रकारच्या अनेक पदार्थांच्या ज्ञानाला बहुविध अवग्रह म्हणतात.
५) क्षिप्र-बाणाप्रमाणे वेगवान पदार्थांच्या ज्ञानाला किंवा जलद होणाऱ्या ज्ञानाला क्षिप्रावग्रह म्हणतात.
६) अक्षिप्र-अक्षिप्र-मंद वेगवान पदार्थांच्या ज्ञानाला किंवा मंदगतीने होणाऱ्या ज्ञानाला अक्षिप्र अवग्रह म्हणतात.
७) निःसृत-बाहेर स्पष्ट दिसणान्या पदार्थांच्या ज्ञानाला नि:मृत अवग्रह म्हणतात.
८) अनिःसृत-बाहेर स्पष्ट न दिसणा-या पदार्थांच्या ज्ञानाला अनि:सृत अवग्रह म्हणतात.
९) उक्त-दुसऱ्याने सांगितलेल्या पदार्थांच्या ज्ञानाला उक्त अवग्रह म्हणतात. .. १०) अनुक्त-न सांगितलेल्या पदार्थांच्या केवळ संकेतावरून होणा-या ज्ञानाला अनुक्त अवग्रह म्हणतात.
११) ध्रुव-ध्रुव स्थिर पदार्थांच्या ज्ञानाला ध्रुव अवग्रह म्हणतात.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org