________________
तत्त्वार्थसार
२१
जे सम्यग्ज्ञान म्हटले आहे त्यविषयी शंका उपस्थित करून त्याचे समाधान केले आहे.
( शंका)- ननु तत्त्वज्ञानस्य सर्वथा प्रमाणत्वसिद्धेः अनेकान्तविरोधः ।
(समाधान)- इति न मन्तव्यं, बुद्धेः अनेकान्तात् ।
(शंका)- तत्त्वज्ञानाला जर सर्वथा प्रमाण मानले तर अनेकान्त तत्त्वामध्ये विरोध येईल?
(समाधान)- हे म्हणणे बरोबर नाही. बुद्धिरूप क्षायोपशमिक ज्ञानाला अनेकान्तस्वरूप मानले आहे. अर्थात् त्या ज्ञानामध्ये जेवढा समीचीनपणा आहे त्याचे प्रामुख्याने वर्णन करून या ज्ञानाला सम्यग्ज्ञान म्हटले. परंतु ते ज्ञान आंशिकज्ञान असल्यामुळे त्यामध्ये जेवढा अज्ञान रूप अंश आहे तो अप्रमाणरूप आहे तथापि त्याला गौण करून त्या क्षायोपमिक ज्ञानाला सम्यग्ज्ञान म्हटले आहे.
त्याच प्रमाणे प्रमाणाभास ज्ञानाला देखील यद्यपि अप्रमाण म्हटले आहे तथापि त्या ज्ञानात जेवढा अंश समीचीन आहे त्याला गौण करून जेवढा अंश असमीचीन-अप्रमाण आहे त्याची मुख्यता घेऊन त्या ज्ञानाला प्रमाणाभास म्हटले आहे.
जसे- दृष्टिदोषामुळे ज्याला एक चंद्र असताना दोन चंद्र दिसतात त्याचे ते ज्ञान चंद्राचे ज्ञान समीचीन असल्यामुळे सर्वथा अप्रमाण म्हटले जात नाही. तथापि एक चंद्र दोन चंद्र रूपाने दिसतो ते दिसणे असमीचीन आहे. त्याची प्रधानता विवक्षित करून ते ज्ञान प्रमाणाभास म्हटले जाते.
श्रुतज्ञान व त्याचे भेद मतिपूर्वं श्रुतं प्रोक्तं अवस्पष्टार्थतर्कणं । तत्पर्यायादिभेदेन व्यासाद् विंशतिधा भवेत् ॥२४।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org