________________
तत्त्वार्थसार
मतिज्ञानाचे प्रकार स्वसंवेदनमक्षोत्थं विज्ञानं स्मरणं तथा । प्रत्यभिज्ञानमूहश्च स्वार्थानुमितिरेव वा ॥१९॥ बुद्धि-मेधादयो याश्च मतिज्ञानाभिदा हिताः । इन्द्रियानिन्द्रियेभ्यश्च मतिज्ञानं प्रवर्तते ॥२०॥
अर्थ- १) स्वसंवेदन प्रत्यक्ष, २) इंद्रिय प्रत्यक्ष, ३) स्मृति ४) प्रत्यभिज्ञान, ५) तर्क, ६) अनुमान (स्वार्थानुमान, परार्थानुमान) बुद्धि-मेधा इत्यादिक मतिज्ञानाचे अनेक भेद आहेत.
१) स्वसंवेदन प्रत्यक्ष- मी सुखी, मी दुःखी इत्यादि रूपाने ज्ञानाला स्वतःचे जे ज्ञान एकेंद्रियापासून सर्वजीवाना 'अहंप्रत्यय ' रूप स्वसंवेदनरूप ज्ञान होते त्याला स्वसंवेदन प्रत्यक्ष म्हटले आहे. याला अंतरंगप्रत्यक्ष म्हणतात. स्वसंवेदन स्वव्यवसाय हे ज्ञानाचे वास्तविक मूळ लक्षण आहे. जे पुद्गल आदि अचेतन पदार्थ आहेत त्याना अहंप्रत्यय रूप स्वसंवेदन होत नाही म्हणून पदार्थाचे देखील ज्ञान होत नाही.
ज्या प्रमाणे दीपकाचा स्वभाव स्वप्रकाशस्वरूप आहे, त्याच्या स्वप्रकाशात परप्रकाश्य पदार्थ स्वयं प्रतिभासित होतात म्हणून आपण दीपकाला स्व-परप्रकाशक म्हणतो. वास्तविक परप्रकाश करणे हा दीपकाचा स्वभाव नाही. ते दीपकाचे मुख्य कार्य-प्रयोजन नाही.
त्याच प्रमाणे ज्ञानाचा स्वभाव वास्तविक स्वप्रकाश स्वरूप आहे. स्वव्यवसाय हे ज्ञानाचे मुख्य प्रयोजन कार्य आहे. त्याच्या स्वव्यवसायरूप दर्पणात ज्ञेय परपदार्थाचा प्रकाश स्वयं प्रतिबिंबित होतो म्हणून ज्ञानाला स्व-परप्रकाशक म्हटले जाते.
२) इंद्रियप्रत्यक्ष- स्वसंवेदनप्रत्यक्ष पूर्वक यथासंभव इंद्रिय व मन यांच्या सहायाने जीवाला ज्ञेय पदार्थाचे जे ज्ञान होते त्याला इंद्रियप्रत्यक्ष म्हणतात. हे इंद्रियप्रत्यक्षज्ञान इतर स्मृति, प्रत्यभिज्ञानअनुमान इ. परोक्ष ज्ञानाच्या अपेक्षेने स्पष्ट असते म्हणून व्यवहारात या ज्ञानाला सांव्यवहारिक प्रत्यक्ष म्हणतात. वास्तविक हे ज्ञान पराच्या
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org