________________
तत्त्वार्थसार
आपण व्यवहारामध्ये मी डोळ्याने स्पष्ट पाहिले. कानाने स्पष्ट ऐकले. हाताने स्पष्ट स्पर्शज्ञान केले. जिभेने पदार्थाचा स्पष्ट स्वाद घेतला. नाकाने स्पष्ट वास घेतला असे म्हणतो पण वास्तविक ते सर्व ज्ञान स्पष्ट नसून अविशद-अस्पष्ट असते. त्या इंद्रिय ज्ञानाला सांव्यवहारिक प्रत्यक्ष म्हटले आहे. अर्थात् व्यवहारात स्पष्ट म्हटले जाते. पण वास्तविक ते स्पष्ट विशद-निर्मल नसते. ज्याप्रमाणे ज्याची दृष्टी कमी झाली आहे त्याला चष्मा लागतो. चष्मा लावल्या शिवाय त्याला दिसत नाही. चष्म्याने स्पष्ट दिसते असे आपण म्हणतो परंतु चष्मा न लावता डोळयाने जसे स्पष्ट दिसते, तसे चष्मा लावून स्पष्ट दिसत नाही. थोडे अस्पष्ट अंधक दिसते. तसेच हे इंद्रियाधीन परोक्षज्ञान प्रत्यक्षज्ञानापेक्षा अस्पष्ट-अंधुक असते म्हणून इंद्रियज्ञानाला अविशद-अस्पष्ट-परोक्ष असे नाव दिले आहे.
वास्तविक ज्ञानाचा स्वभाव जाणणे मात्र आहे. ज्ञानप्रकाशरूपी दर्पणात संपूर्ण ज्ञेय पदार्थ स्वयं प्रतिबिंबित होतात. सर्व पदार्थास जाणण्यासाठी ज्ञानाला आपला उपयोग परपदार्थाकडे द्यावा लागत नाही. ज्ञानाने आपला उपयोग आपल्या ज्ञानदर्पणाकडे लावला की त्यात लोकअलोकातील सर्व पदार्थ युगपत् स्वयं प्रतिबिंबित होतात. वास्तविक निश्चयनयाने केवली भगवान आत्मज्ञ असतात. त्यांच्या आत्मज्ञानदर्पणात सर्व ज्ञेय पदार्थ स्वयं प्रतिबिंबित होतात म्हणून आपण व्यवहार नय ने त्याना सर्वज्ञ म्हणतो.
पारमार्थिक प्रत्यक्ष प्रमाण इंद्रियानिद्रियापेक्षामुक्तमव्यभिचारि च । साकारग्रहणं यत् स्यात् तत् प्रत्यक्ष प्रचक्ष्यते ॥१७॥ अर्थ- जे ज्ञान इंद्रिय व अनिद्रिय मन यांच्या अपेक्षेने रहित आत्मस्वभावाने होते, ज्यामध्ये कोणताही व्यभिचार दोष येत नाही असे जे पदार्थाचे, रूपी अरूपी पदार्थाचे जे साकार-सविकल्प व्यवसायात्मक, निश्चयात्मक स्पष्ट विशद ग्रहण ते पारमाथिक प्रत्यक्षज्ञान म्हटले जाते.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org