________________
१२
तत्त्वार्थसार
प्रमाण लक्षण व त्याचे भेद सम्यग्ज्ञानात्माकं तत्र प्रमाणमुपवर्णितं ।
तत्परोक्षं भवत्येकं प्रत्यक्षमपरं पुनः ।।१५।।
अर्थ- वस्तूच्या संपूर्ण अंशाचे जे समीचीन यथार्थज्ञान ते प्रमाणज्ञान होय. प्रमाणाचे २ भेद आहेत. १ प्रत्यक्ष २ परोक्ष.
_परोक्ष प्रमाण लक्षण समुपात्तानुपात्तस्य प्राधान्येन परस्य यत् ।।
पदार्थानां परिज्ञानं तत् परोक्षमुदाहृतं ॥१६॥
अर्थ- उपात्त शरीराशी संबद्ध अशी इंद्रिये व अनुपात्त, असंबद्ध बाह्य आलोकादि परनिमित्ताचे प्राधान्य मुख्यता घेऊन जे पदार्थाचे ज्ञान ते परोक्षप्रमाण म्हटले गेले आहे.
अक्ष म्हणजे आत्मा. त्याहून पर भिन्न जे उपात्तनिमित्त इंद्रियादि व अनुपातनिमित्त इतर बाह्य निमित्त आलोक आदि त्यांचे प्राधान्य घेऊन जे रूपी पदार्थाचे ज्ञान ते परोक्षज्ञान होय. किंवा अक्ष म्हणजे इंद्रिय. जे ज्ञान अन्यइंद्रिय आलोक आदि वाह्य निमित्ताची अपेक्षा सहाय्य घेऊन होते त्यास परोक्ष म्हणतात. वास्तविक ज्ञानाचा स्वभाव ज्ञेय पदार्थाला प्रत्यक्ष साक्षात् परनिमित्ताचे सहाय्य न घेता जाणणे हा आहे. परंतु अनादि काळापासून या जीवास आपल्या स्वभावाचे भान नाही. त्या मुळे त्याचे ज्ञान पराधीन होऊन इंद्रियादि उपात्त साधन व प्रकाश आदि अनुपात्त साधन परनिमित्त यांची अपेक्षा ठेवून प्रामुख्याने परनिमित्ताच्या माध्यमातून रूपी पदार्थाला जाणते म्हणून या ज्ञानास परोक्षज्ञान म्हटले आहे.
वास्तविक ज्ञानाचा स्वभाव रूपी-अरूपी सर्व पदार्थाना युगपत जाणणे आहे. परंतु हे इंद्रियाधीन पराधीन परोक्षज्ञान इंद्रियाचे विषयरूपी मूर्तिक पदार्थच असल्यामुळे केवळ रुपी पदार्थाना व जाणते.
तसेच ज्ञानाचा स्वभाव पदार्थाला विशद-स्पष्ट जाणणे हा आहे. परंतु हे परोक्षज्ञान इंद्रियाच्या माध्यमातून होत असल्यामुळे पदार्थाला अविशद अस्पष्ट जाणते.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org.